Homeव्हिडिओ बातम्याअखेर प्रशासनाने लेखी आश्वासन दिले .शहाजी राजे भोसलेंचे नान्नज विविध विकास कामांसाठीचे...

अखेर प्रशासनाने लेखी आश्वासन दिले .शहाजी राजे भोसलेंचे नान्नज विविध विकास कामांसाठीचे उपोषण स्थगित

अखेर प्रशासनाने लेखी आश्वासन दिले

नान्नजच्या विविध विकास कामांसाठीचे शहाजी राजेभोसले यांचे उपोषण स्थगित.

जामखेड प्रतिनिधी
नान्नजच्या विकासाच्या दृष्टीने विविध मागण्यांसाठी शहाजी राजेभोसले यांचे सुरू असलेले उपोषण अंदोलन चौथ्या दिवशी
अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले .
नान्नज गावातील विविध प्रलंबित विकासकामे व मूलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी रामचंद्र राजेभोसले यांनी आमरण उपोषण सुरू केले होते .ग्रामस्थांनी पाठींबा म्हणून एक दिवस गाव बंद तसेच दुसऱ्या दिवशी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते .

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्यानंतर राजेभोसले यांनी उपोषणाची सांगता केली.

नान्नज गावातील बसस्थानकाचा प्रश्न, राष्ट्रीयीकृत बँकेची सुविधा, रस्त्यांची दुरवस्था तसेच इतर मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहाजी राजेभोसले यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. गावाच्या विकासासाठी प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करून संबंधित कामांना गती द्यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली होती.
उपोषण सुरू झाल्यानंतर प्रशासनातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी राजेभोसले यांच्याशी चर्चा केली. यावेळी नान्नज गावातील विविध प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा होऊन संबंधित विभागांकडून मागण्यांच्या पूर्ततेबाबत लेखी आश्वासन देण्यात आले.

अधिकाऱ्यांकडून मागण्या लेखी स्वरूपात मान्य झाल्यानंतर राजेभोसले यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची अखेर प्रशासनाच्या आश्वासनाने सांगता झाली.

दरम्यान, केवळ लेखी आश्वासन देऊन प्रशासनाने थांबू नये, तर दिलेल्या आश्वासनांची वेळेत प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी.

नान्नज गावातील प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावून नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!