Homeव्हिडिओ बातम्या२२डिसेंबरला सनराईज शैक्षणिक संकुलात सांस्कृतिक कार्निवल, सर्वांनी उपस्थित राहण्याचे डॉ संजय भोरे...

२२डिसेंबरला सनराईज शैक्षणिक संकुलात सांस्कृतिक कार्निवल, सर्वांनी उपस्थित राहण्याचे डॉ संजय भोरे यांचे आवाहन

सनराईज संकुलात २२ डिसेंबरला सांस्कृतिक कार्निव्हल

सर्वांनी उपस्थित राहण्याचे डॉ संजय भोरे यांचे आवाहन

जामखेड प्रतिनिधी

सनराईज मेडिकल अँड एज्युकेशन फौंडेशनच्या वतीने सनराईज सांस्कृतिक कार्निव्हलचे आयोजन सोमवार, दि. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सनराईज एज्युकेशनल कॅम्पस, पाडळी फाटा येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य विधान परिषद अध्यक्ष मा.प्रा.राम शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फौंडेशन चे अध्यक्ष डॉ. संजय भोरे हे आहेत.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, कला-संस्कृतीचे संवर्धन करणे तसेच शैक्षणिक वातावरणात सांस्कृतिक जाणिवा रुजविणे, हा या कार्निव्हलचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमात एल के जी ते 12 वी पर्यंत चे विध्यार्थी – विध्यार्थिनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे होणार आहे.

या सांस्कृतिक सोहळ्यास विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!