सर्वपरिचित बहूजन विचाराचे व्यक्तिमत्व म्हणजे भानुदास बोराटे होय!
सौ. योगिता भानुदास बोराटे नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात:
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक उमेदवार 
जामखेड प्रतिनिधी
सर्वपरिचित दूरदृष्टी ठेवणारे, बहूजनांचा विचार करणारे व्यक्तिमत्व, जामखेडला आपल्या कामातून चांगली ओळख देणारे, शैक्षणिक कामाचा ठसा उमटवणारे भानुदास बापु बोराटे हे जामखेड नगरपरिषद निवडणूक २०२५ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरत आहेत.
भानुदास बोराटे हे शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचाराचे पाईक आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराशी एकनिष्ठ असलेले आमदार रोहित पवार यांचे विश्वासू म्हणून ओळख आहे.
भानुदास (बापू) बोराटे यांच्या सौभाग्यवती योगिता भानुदास बोराटे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदार समजल्या जात आहेत.
भानुदास (बापू) बोराटे हे १९८४ पासून बामसेफ च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर राहिले आहेत. बहुजन समाजासाठी
विविध सामाजिक उपक्रम राबवतात. गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आमदार रोहित पवार यांच्या बरोबर काम करत आहेत. दहा वर्षांत आमदार रोहित पवार यांचा विश्वास त्यांनी संपादन केला आहे.
बाप्पु यांनी जामखेड पंचायत समिती सदस्य म्हणून निवडणूक लढविली होती पण निसटता पराभव झाला होता तसेच दोन पंचवार्षिक दहा वर्षे ग्रामपंचायत सदस्य होते. या काळात त्यांनी जामखेड शहरात उल्लेखनीय कामे मार्गी लावलेली आहेत. आमदार रोहित पवार यांनी भानुदास बोराटे यांना नगराध्यक्ष पदाच्या मुलाखतीसाठी पुणे येथे बोलाविले होते. तसेच अर्ज भरण्यास सांगितलेला आहे.
-बापू यांचे शैक्षणिक योगदान-
जामखेड परिसरातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळावे म्हणून महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बी. एड महाविद्यालय, व्हिटरनरी डिप्लोमा, दोन वर्षाचा अभ्यासक्रम सुरू केले. तसेच विद्यार्थी स्पर्धेत टिकावा म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची इंग्रजी माध्यमाचे रायसिन्हा इंटरनॅशनल स्कूल सुरू केले. या संस्थेने जागतिक स्पर्धेत टिकणारे विद्यार्थी घडविले. याचबरोबर शिक्षक व जनावरांचे डॉक्टर निर्माण घडविले. सौ योगिता भानुदास (बापू) बोराटे या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडणूक रिंगणात आहेत .नगराध्यक्ष पदाची संधी मिळाल्यास स्वच्छ सुंदर जामखेड साठी काम करणार, शहरातील रस्ते, स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी, युवकांना रोजगार, शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी काम करणार आहे असे सौ. योगिता भानुदास बोराटे यांनी सांगितले.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
