Homeव्हिडिओ बातम्यासत्ते साठी नाही तर सत्यासाठी राज्यकर्ते व प्रस्थापितांविरुद्ध लढाई - :अँड अरूण...

सत्ते साठी नाही तर सत्यासाठी राज्यकर्ते व प्रस्थापितांविरुद्ध लढाई – :अँड अरूण जाधव :जामखेडला तिसरी आघाडी हा पर्याय – : राहुल उगले

सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी
राज्यकर्ते व प्रस्थापितांविरुद्ध लढाई – अँड अरूण जाधव

जामखेडला तिसरी आघाडी हा पर्याय – राहुल उगले

काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, रासपा, स्वाभिमानी शेतकरी संघटना

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहराच्या विकासासाठी व भारतीय संविधानाला मानणाऱ्या व जातीवादी शक्तीच्या विरोधामध्ये काम करणाऱ्या समविचारी पक्षाची जामखेड नगरपालिका निवडणुकीत एकत्र मोट बांधून आम्ही तिसरी आघाडी हा पर्याय जामखेड नगरपरिषदला देणार आहोत. सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आमची लढाई आहे. तसेच जामखेड नगरपालिकेच्या सर्व जागा एकत्रित लढवण्यासाठी आमची तयारी आहे. असे वंचित बहुजन आघाडीचे अँड अरूण जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जामखेड नगरपरिषद निवडणूक २०२५ अनुशंगाने तिसरया आघाडीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ॲड.डॉ.अरुण जाधव (वंचित बहुजन आघाडी), राहुल उगले (काँग्रेस), विकास मासाळ (राष्ट्रीय समपक्ष), सुनील लोंढे (स्वाभिमानी शेतकरी संघटना),आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राहूल उगले म्हणाले की सर्व समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा तिसरा आघाडीचा प्रयत्न केला जाईल. समविचारी लोकं, पक्ष, संघटना आमच्या संपर्कात आहेत. तिसरया आघाडीमुळे विधानसभा, बाजार समिती आदी ठिकाणी निकाल फिरले आहेत हे सगळयांना माहीत आहे .

अँड अरूण जाधव म्हणाले की आठरापगड समाजाला बरोबर घेऊन स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार देणार आहे. प्रस्थापितांना व सत्ताधारयांना आम्ही जनतेच्या विश्वासावर मोठी कामगिरी करून दाखवणार आहे.ही लढाई सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे. नगरसेवक पदासाठी अनेक इच्छुक उमेदवार आमच्याशी संपर्क साधून आहेत. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी काही मोठे नेतेही तिसरया आघाडीच्या संपर्कात आहेत. तेव्हा जामखेडकरांनी सत्याला साथ द्यावी असे आवाहन अरूण जाधव यांनी केले.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!