संत वामनभाऊ महाराज पालखीचे पहिला रिंगण सोहळा जामखेडला उत्साहात .विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे यांनी केले दिंडीचे स्वागत
जामखेड शहरालगत असलेल्या जमादारवाडी येथील संत वामनभाऊ गड येथे गुरुवार दि १६ जूलै रोजी
वारकरी संप्रदायाचे मूळ उगमस्थान म्हणून गहिनीनाथ गडाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या पालखी सोहळ्याला विशेष मानाचे स्थान आहे.
जामखेड शहरात आगमन होताच, तपनेश्वर येथे श्रीनागेश्वर भजनी मंडळाने टाळ मृदंग विना घेऊन भजन करत सामोरे जाऊन, दिंडीचे स्वागत केले.
यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिंडीचे स्वागत करत सहभागी झाले.दरम्यान शहरात ठिकठिकाणी पालखी मार्गावर सडा रांगोळी काढून महिलांनी स्वागत केले. ठिकठिकाणी वारकऱ्यांना नागरिकांनी फळे, चहा बिस्कीट, नास्ता औषधे, पाणी व्यवस्था केली होती. शहरातील श्रीविठ्ठल मंदिरात श्रीविठ्ठल भजनी मंडळाच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले. तेथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर जगदाळेवस्ती येथे पंगत झाली .
जमादारवाडी येथील संत वामनभाऊ मंदिर येथे पालखीचे आगमन झाले. यावेळी जमादारवाडी ग्रामस्थ व पंचक्रोशीच्या वतीने जामखेडचे नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी व अमित चिंतामणी यांच्या हस्ते
मंदिराच्या भव्य प्रांगणात मध्यभागी पालखी रथ उभा करण्यात आला. पताकाधारी वारकरी, विणेकरी टाळ मृदंगाच्या तालावर पुंडलिक वरदे हरी विठ्ठल… गहिनीनाथ महाराज की जय, संत वामनभाऊ महाराज की जय , या जयघोषात भरधाव वेगाने पालखीला प्रदक्षिणा करू लागले. यावेळी भाविकांनी एकच जय जयकार केला.
जामखेड परिसरातून पंढरपूरला दररोज अनेक दिंड्या जातात. मात्र संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळा हा सर्वात भव्य दिव्य सोहळा अनुभवास येतो. जमादारवाडी येथे होणारे रिंगण हे एकमेव आहे. त्यामुळे या परिसरातील भक्तगणांसाठी ही पर्वणीच ठरते. राज्यभरातून लाखो संख्येने वारकरी हे या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. या रिंगण सोहळ्यानंतर पुढे जमादारवाडी येथे भोजन करून सारोळा येथे ही दिंडी मुक्कामी पोहोचली.
RELATED ARTICLES





