Homeव्हिडिओ बातम्यासंत ज्ञानेश्वर माऊली संगीतमय चरित्र कथेचे भव्य आयोजन जामखेड येथे बुधवारी श्रीनागेश्वर...
संत ज्ञानेश्वर माऊली संगीतमय चरित्र कथेचे भव्य आयोजन जामखेड येथे बुधवारी श्रीनागेश्वर सप्ताहाची सुरुवात
संत ज्ञानेश्वर माऊली संगीतमय चरित्र कथेचे भव्य आयोजन
जामखेडला बुधवारी श्रीनागेश्वर सप्ताहास प्रारंभ
जामखेड प्रतिनिधी
जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ‘शिवलीलामृत’ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 751 व्या जन्मोत्सवी वर्षाच्या औचित्यावर यावेळी संत ज्ञानेश्वर माऊली संगीतमय चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीक्षेत्र तेर (गोरोबा काकांचे) येथील
सकल संत चरित्र व श्री राम कथा प्रवक्ते ह.भ.प श्री. दीपकजी महाराज यांच्या वाणीतून ही कथा सात दिवस श्रवण करण्याचा लाभ श्रोत्यांना मिळणार आहे बुधवारी या भव्य कार्यक्रमास प्रारंभ होईल. शिवलीलामृत पारायण गुरुवार पासून सुरू होणार आहे.
यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला श्रीनागेश्वर पालखी सोहळा सोमवार दि. 17 अॅगष्ट सकाळी होणार आहे.

बुधवार दि. 12 ऑगष्ट रोजी दुपारी दोन वाजता विणापूजन करून सप्ताहास प्रारंभ होईल. त्यानंतर 3 ते 4.30 या वेळेत अॅड. महारुद्र महाराज नागरगोजे किर्तन होईल. सायंकाळी 6 ते 9 या वेळेत संत ज्ञानेश्वर माऊली संगीतमय चरित्र कथेस प्रारंभ होईल.
गुरुवारी बाळासाहेब महाराज गाडे
शुक्रवारी रामचंद्र महाराज शिंदे
शनिवार राजेंद्र महाराज म्हेत्रे
रविवारी संतोष महाराज बांगर
सोमवारी दादासाहेब महाराज सातपुते
मंगळवारी विवेकानंद महाराज मंजरतकर यांची किर्तने होतील.
बुधवारी दि 19 अॅगष्ट रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत चेतन महाराज बोरसे मालेगाव यांचे काल्याचे कीर्तन होईल व महाप्रसादाने या संपूर्ण उत्सवाची सांगता होईल.

दैनंदिन कार्यक्रम
पहाटे काकडा, सकाळी 8.30 ते 10 श्री शिवलीलामृत पारायण, 10 ते 12 गाथा भजन, दुपारी 3 ते 4.30 किर्तन, 5 ते 6 हरिपाठ व नंतर
दररोज सायंकाळी 6 ते 9 या वेळेत संत ज्ञानेश्वर माऊली संगीतमय चरित्र कथा नंतर भोजन होईल.
तरी वरील सर्व कार्यक्रमांचा परिसरातील भक्तांनी लाभ घ्यावा
असे आवाहन श्रीनागेश्वर पालखी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्रीनागेश्वर सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!