Homeव्हिडिओ बातम्याशितल हुलगुंडे वायरमनवर मनुष्यवधाचा गून्हा दाखल : बाळगव्हाण येथील शिकारे पिता पुत्राच्या...

शितल हुलगुंडे वायरमनवर मनुष्यवधाचा गून्हा दाखल : बाळगव्हाण येथील शिकारे पिता पुत्राच्या मृत्यूस कारणीभूत

वायरमन शितल हुलगुंडे वर खर्डा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल:
शिकारे पिता पुत्राच्या मृत्यूस कारणीभूत

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील शेतामध्ये काम करीत असताना विजेच्या तुटलेल्या तारांना स्पर्श होऊन काकासाहेब शिकारे व महेश शिकारे या दोघां पितापुत्राच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा अखेर वायरमन शितल हुलगुंडे याच्यावर खर्डा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की,दि२३ जून २०२५ रोजी काकासाहेब शिकारे वय ४४ वर्षे व त्यांचा मुलगा महेश शिकारे वय १५वर्षे हे दोघे पितापुत्र शेतामध्ये खते टाकत असताना तुटलेला वीजतारांना चिटकून शॉक बसल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.या भागातील ड्युटीवर असलेले वायरमन शितल मधुकर हुलगुंडे यांनी बाळगव्हाण शिवारातील विजेच्या इलेक्ट्रिक तारा तुटल्याने वीज कनेक्शन बंद न केल्यास कोणाचाही जीव जाऊ शकतो हे माहीत असताना सुद्धा व सदरच्या तुटलेल्या तारा त्यांना सांगूनही त्यांनी काही एक दुरुस्ती केली नाही असे ग्रामस्थांनी सांगितले. तारा मधील करंट बंद केला नाही. कामात हलगर्जी पणा केल्यामुळे सदरच्या तुटलेल्या तारांना शिकारे पिता, पुत्रांचा मृत्यूस कारणीभूत असल्याचा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा गुन्हा इंद्रराज सदाशिव शिकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रजिस्टर गुन्हा पोलीस ठाणे अंमलदार एस.जी. धामणे यांनी दाखल करून घेतला आहे.

याबाबत पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत हे करीत आहेत.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!