Homeव्हिडिओ बातम्यालोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त भव्य मिरवणूक : खर्डा येथे उत्साहात जयंती...

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त भव्य मिरवणूक : खर्डा येथे उत्साहात जयंती साजरी

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  जयंतीनिमित्त भव्य मिरवणुक संपन्न:

खर्डा येथे उत्साहात जयंती साजरी

जामखेड प्रतिनिधी

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक खर्डा नगरीत भव्य मिरवणुक काढण्यात आली.

यावेळी शिव,फुले,शाहू,आंबेडकर,साठे चळवळीतील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते. ऐतिहासिक खर्डा शहरातील साठे नगर येथून या भव्य दिव्य मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली.याप्रसंगी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला स्मारक समितीचे अध्यक्ष विलास (नाना) जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच ऐतिहासिक किल्ला मैदान येथुन मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली.भव्य मिरवणुक संपुर्ण खर्डा गावाच्या प्रमुख गल्लीतून काढण्यात आली.यावेळी जुनी ग्रामपंचायत समोरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक असलेल्या फलकाला सरपंच संजिवनीताई पाटील,टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ माने,पुणे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते युवराज भाऊ वाल्हेकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

भव्य दिव्य जयंती मिरवणुकीत जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश भाऊ जाधव,आझाद क्रांती सेनेचे आष्टी तालुकाध्यक्ष संदिप वाल्हेकर,मार्केट कमिटीचे संचालक वैजिनाथ पाटील,खर्डा ग्रामपंचायतचे सदस्य राजु मोरे,प्रकाश गोलेकर,दिपक जावळे,पञकार बाळासाहेब शिंदे,पञकार रिजवान बागवान,ओम तानाजी पवळे,किरण पौडमल,बबन (वस्ताद) मदने,बभिषण चौघुले,रशिद बागवान,शकूरभाई शेख,दादा मोरे,सलमान पठान,किरण जाधव,लखण जाधव,सचिन जाधव,निलेश मोरे,शंकर गायकवाड,समाधान जाधव,किशोर जावळे,सचिन पगारे,अक्षय डाडर,रोहित डाडर,लाल्या मोरे,किरण गायकवाड,आतिश जाधव,कृष्णा डाकले,चैतन गायकवाड,ओम डाडर आदि.पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येंने सामील झाले होते.

यावेळी जयंती उत्सव समितीच्या वतीने अन्नदान करण्यात आले.यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश भाऊ जाधव व पञकार रिजवान बागवान यांनी जयंती मिरवणुक शांततेत संपन्न झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.यावेळी खर्डा पोलिसांनी विशेष असे सहकार्य केले.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!