Homeव्हिडिओ बातम्याभर रस्त्यात सोन्याची साखळी हिसकावली : महिला वर्गात भीतीचे वातावरण :भुरट्या चोरांचा...

भर रस्त्यात सोन्याची साखळी हिसकावली : महिला वर्गात भीतीचे वातावरण :भुरट्या चोरांचा सुळसुळाट

भर  गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली :
महिलावर्गात भीतीचे वातावरण:रस्त्यात

भुरट्या चोरांचा सुळसुळाट

जामखेड प्रतिनिधी
भर रस्त्यात मोटारसायकलवरून येत महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून चोरांनी पळ काढला. शहरातील महिला वर्गात या घटनेमुळे भुरट्या चोरांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
या प्रकरणी फिर्यादी महिला पल्लवी अनिल सानप वय२८ सदाफुले वस्ती जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असल्यामुळे माझी भाची वेदीका अशोक डोंगरे ही आमच्याकडे घरी आली आहे. दि. २७ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:१५ वाजताच्या अँक्टीव्हा स्कूटी नं. एमएच १६ डीटी ६५५१ माझी भाची वेदीका अशोक डोंगरे हिच्यासोबत एका कापड दुकानातून कपडे खरेदी करून सायंकाळी ७:१० वाजताच्या सुमारास सदाफुले वस्तीवरील असलेल्या घराकडे जात असताना माझी भाची वेदीका ही स्कुटी चालवत होती व मी पाठीमागे बसले होते. आम्ही  सदाफुले वस्ती जवळील टॉवरचे शेजारी मधुकर दळवी यांच्या केश कर्तनालयाच्या दुकानासमोर आम्ही आलो असता पाठीमागून शाईन कंपनीच्या मोटारसायकल वरून दोन अज्ञात इसम आले व गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली व पसार झाले.
त्यापैकी एकाचे अंगात काळा शर्ट, चेहरा काळ्या मास्कने झाकलेला व शरीराने सडपातळ, मजबुत तर मागे बसलेला मजबूत असून अंगात पांढरा रंगाचा शर्ट घातलेला असे दोघे शाईन मोटारसायकलवरून आले व त्यांनी माझे गळ्यातील १८ ग्रॅम (५५,००० रूपये) वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून घेऊन गेले. यावेळी मी व माझी भाची वेदीका हिने त्या चोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्यांच्या ताब्यातील शाईन कंपनीची मोटारसायकल ही भरधाव वेगात चालवून निघून गेले.
यानुसार पल्लवी अनिल सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात गंठण चोरांविरुद्ध गु. नं. ०५८०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३९२ नुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र सरोदे हे करत आहेत.दरम्यान घटनेमुळे सदर महिलेसह सदाफुले वस्ती येथील महिला भयभीत झाल्या असून सदाफुले वस्ती येथील सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष वसीमभाई सय्यद, उमर कुरेशी, राजेंद्र सदाफुले, नासिर सय्यद, अनिल सानप व पक्ष पदाधिकारी शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांची भेट घेऊन या प्रकरणाचा तत्काळ तपास करावा व आरोपीस अटक करावी अशी मागणी केली तसेच लवकरात लवकर तपास न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला.पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी तपास प्रकरणी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित शिष्टमंडळाला दिले. सदर महिलेने आपल्या स्कुटीवरून पाठलागही केला, युवक मात्र चोरटे भरधाव वेगाने पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेमुळे सदर महिलेसह सदाफुले वस्तीवरील महिला भयभीत झाल्या असून सदाफुले वस्ती येथील सामाजिक कार्यकर्ते व पक्ष पदाधिकारी यांनी शिष्टमंडळासह पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांची भेट घेऊन या प्रकरणाचा तपास करावा तसेच आरोपीस अटक करावी अशी मागणी केली. तसेच लवकरात लवकर तपास न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!