पाणी सोडण्याचे काँक /वाँल अपघात करतील
मग नगरपरिषद जागे होईल??
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी प्रत्येक गल्लीत तसेच रस्त्यावर जागोजागी पाणी चालू करण्यासाठी वाल /काँक बसविलेले आहे.
मात्र हे काँक अनेक ठिकाणी रस्त्यावरच मध्यभागी बसविलेले वाँल खड्डयात आहे ते खड्डे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना तसेच पायी चालणारांना त्रासदायक ठरत आहेत. एखादा अपघात होईल तेव्हा नगरपरिषद जागे होईल की नाही शंकाच आहे. 
पोलीस स्टेशनच्या जवळ अगदी यू टर्न जवळच मोठा खड्डा आहे. पाण्याचा वाँल त्यात आहे. प्रत्येक वाहनांना विशेष म्हणजे यू टर्न घेतल्याबरोबर वाहनांना या खड्याचा सामना करावा लागतो. गाडी धडकन आदळते.
तसेच पायी चालणारांना कधी कधी खड्डा चुकवणे अवघड होते. अनेक वेळा नागरिक या येता जाता या खड्डयांना चुकवून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना पडता पडता सावरलेले आहेत.
नगरपरिषदेचे पाणी पुरवठा विभागातील पाणी सोडणारे कर्मचारी तसेच नागरिक रोज शहरातील विविध भागात पाणी सोडण्याच्या वाँल /काँक च्या जागी असलेले खड्डे पहातात.व होणारा त्रास सहन करतात मात्र नगरपरिषद प्रशासनाला कोणीही सांगत नाही. नगरपरिषद प्रशासनाने तातडीने अशा ठीकाणी वाँल शेजारी पडलेल्या खड्डयांचा घेराव सिमेट वाळू टाकुन कमी करण्याची गरज आहे. एखाद्या अपघातानंतर कोण जवाबदार राहील.
संपूर्ण शहरांअतर्गत गल्लोगल्ली रस्ते पुरेसे व्यवस्थित नाहीत. आहे त्यामध्ये असे अडचणी निर्माण करणारे खड्डे पडले आहेत. नगरपरिषद प्रशासनाने तातडीने अशा ठीकाणी लक्ष देऊन काम करणे गरजेचे आहे.
