Homeव्हिडिओ बातम्यादि. २० एप्रिल ते २१ एप्रिल दरम्यान वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा. ...

दि. २० एप्रिल ते २१ एप्रिल दरम्यान वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा. खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

जामखेड प्रतिनिधी

भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार दि २० ते २१ एप्रिल या दोन दिवसांच्या कालावधी आपल्या अहमदनगर जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हयातील शेतकरी व नागरीकांना दक्षता घेणेबाबत आवाहन केले आहे. तरी नागरिकांनी खालील सुचनांचे पालन करून आपली वित्त व जीवीत हानी टाळावी तसेच वादळी वारे, वीज आणि पाऊस यापासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. परिस्थितीत आपत्कालीन नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध पत्रकानुसार खालील सूचना दिल्या आहेत.

१) मेघगर्जनेच्या वेळी, बीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे

राहु नये. विजजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.

२) गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या

सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे,

मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे.३) मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत। दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अधवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणार्‍या लोंबणा-या केबल्स् पासून दूर रहावे. ४) विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास

सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा, ५) अवकाळी पाऊस व बादळी वारा यामुळे शेतीमालाचे६) शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी,

७) जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

——————————

सर्व नागरीकांनी वादळी वारे, बीज आणि पाऊस यापासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण साधावा.

कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 वर संपर्करा जेंद्रकुमार पाटील निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर

 

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!