दिघोळ येथे राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदार,
अधिकार्यांची दिघोळ उपसरपंच व ग्रामस्थां बरोबर उध्दट भाषा
जामखेड प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्गाच्या पैठण ते पंढरपूर पालखी रस्ता दिघोळ गावातून जात आहे गावातील कामाबाबत रस्ता आधिकारी व उपसरपंच दशरथ राजगुरू यांच्यामध्ये चर्चा होत असतांना अधिकारी यांनी आडमुठ्या भुमिकेला राजगुरू यांनी विरोध केला.
तसेच गावातून रस्ता इस्टीमेट प्रमाणे होत नाही
दिघोळ गावातुन जाणारा रस्तावर नाली मध्ये मधोमध विजेचे खांब लावले आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्या रस्त्यात आल्या आहेत.
तसेच रस्त्या पासून लांब असलेले हनुमान विद्यालय, जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंत पाडली आहे ती बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु दिले नाही तसेच रस्तावरील गटारी मध्ये लहान मुले पडली आहे.
या संदर्भात विचारणा उपसरपंच राजगुरू केली यावेळी अधिकार्यांनी उध्दट
भाषा केली यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन निर्णाण झालेले तणावाचे वातावरण शांत केले. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष धीरज रसाळ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यां बरोबर बोलणे केले व संबधीत प्रश्न सोडविण्यासाठी दि २३ मे रोजी संबधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक करण्याचे ठरले.
येत्या दोन दिवसांत महामार्गातील सुचविलेली कामे मार्गी न लागल्यास ग्रामस्थांसह आंदोलन करणार असल्याचे तंटामुक्ती धीरज रसाळ व उपसरपंच दशरथ राजगुरू यांनी सांगितले.

यावेळी ग्रामस्थ माजी पंचायत समिती सदस्य मनोज राजगुरू, माजी सरपंच नाना गिते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूरज रसाळ, लहू शिंदे राहूल टाके दिपक रसाळ आश्रू कोचाळे बळीराम ढवळे धीरज तागड शशिकांत राजगुरू पै. गणेश आटकरे सूलतान शेख बाला गायकवाड वसंत रसाळ यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215*
