Homeव्हिडिओ बातम्यादिघोळ पंचायत समिती गणातून शिवाजी अजिनाथ गिते निवडणुक रिंगणात :सभापती प्रा राम...

दिघोळ पंचायत समिती गणातून शिवाजी अजिनाथ गिते निवडणुक रिंगणात :सभापती प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाच्या नव्या पर्वाची तयारी

दिघोळ पंचायत समिती गणातून शिवाजी अजिनाथ गिते निवडणुक रिंगणात :

सभापती प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाच्या नव्या पर्वाची तयारी 

जामखेड प्रतिनिधी

स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण करणारी घडामोड दिघोळ परिसरात पाहायला मिळत आहे. सभापती प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिघोळ पंचायत समिती गणातून तरुण आणि ऊर्जावान कार्यकर्ते शिवाजी अजिनाथ गिते यांनी आगामी पंचायत समिती निवडणुकीत इच्छुक असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे गणातील राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवाजी गिते हे गेल्या २० वर्षापासुन सभापती प्रा राम शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहून काम करत आहेत. अनेक काही वर्षांपासून सामाजिक, राजकीय संघटनांमधून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील लोकांना विविध समस्यांवर प्रशासन दरबारी समस्या सोडविण्यासाठी त्यांनी मदत केली आहे. कोरोना काळात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांना कोरोना काळात वैद्यकीय मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सतत लोकसंपर्कात आहेत. त्यामुळे त्यांना जनतेचा मतदारवर्गाचा मोठा पाठिंबा मिळणार आहे. सभापती प्रा राम शिंदे यांच्या माध्यमांतून शिवाजी गिते हे दिघोळ गणातील सर्व शेतकरी व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत पाठपुरावा करतात. त्यांच्यावर ग्रामस्थांचा विश्वास आहे. या पार्श्वभूमीवर गिते यांच्या उमेदवारीला स्थानिक जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
दिघोळ गणातील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहतील. दरम्यान, दिघोळ व गणातील इतर गावातील लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे दिघोळ पंचायत समिती गणातील निवडणुकीला शिवाजी गिते यांच्या उमेदवारीमुळे एक नवा उत्साह आणि जोश लाभणार आहे.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!