ते हेटस् स्पीच नाही का ?? ‘चिथावणीखोर भाषण करणाऱ्या आमदारांवर गुन्हे दाखल करा’ मयताला न्याय देण्याच्या नावाखाली स्वार्थी जातीय राजकारण जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
ते हेटस् स्पीच नाही का ??
‘चिथावणीखोर भाषण करणाऱ्या आमदारांवर गुन्हे दाखल करा’
मयताला न्याय देण्याच्या नावाखाली स्वार्थी जातीय राजकारण
जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
जामखेड प्रतिनिधी
सरकारने हेट स्पीच ,जातीय द्वेष निर्माण करने याविरुद्ध कायदा पास केला आहे . दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणारी भाषा बोलणारयांविरोधात गून्हा दाखल होतो .मग पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर एका समाजाला उद्देशून चिथावणीखोर भाषणे झाली .
मग पोलीस आधिकारयांनी का दखल घेतली नाही ?? असा प्रश्न सध्या नागरिकांच्या चर्चेत आहे . धीरज राजपूत (परदेशी) यांच्या हत्येनंतर रास्ता रोको आंदोलन करून अल्पसंख्याक समाजाला उद्देशून चिथावणीखोर भाषणे करणारे आमदार संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अक्षय कर्डिले आणि संग्राम बाप्पू भंडारे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
दुर्दैवी घटनेचे राजकारण करून १० ऑगस्ट रोजी विनापरवानगी राष्ट्रीय महामार्ग पाच तासांहून अधिक काळ रोखून धरल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे. या आंदोलनादरम्यान लोकप्रतिनिधींनी मुस्लीम समाजाला पाकिस्तानात पाठवण्याची, त्यांच्या सुविधा बंद करण्याची प्रक्षोभक भाषा वापरली. केवळ राजकीय भांडवल करण्यासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरणे चुकीचे असून, यातून जिल्ह्यात दंगल भडकण्याची शक्यता होती.

मारहाणीत मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी आहे .मयत धीरज परदेशीला न्याय देण्याच्या नावाखाली स्वार्थी व जातीय राजकारण सदर लोकप्रतिनिधींकडुन केले जात आहे .कायदा आपलं काम करेल .भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींची व इतरांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी डॉ. अशरफी यांनी केली.
प्रतिनिधी यासीनशेख 9423391215
error: Content is protected !!