जामखेड तलाठी कार्यालय बंद; महिलांसह नागरिक त्रस्त
जामखेड | प्रतिनिधी
जामखेड येथील तलाठी कार्यालय गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. विशेषतः ग्रामीण भागातून आलेल्या महिला नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तलाठी कार्यालयात शेतजमिनीचे सातबारा, फेरफार, उत्पन्न दाखले यांसारखी महत्वाची कामे केली जातात. मात्र कार्यालय सतत बंद असल्याने नागरिकांची कामे प्रलंबित राहत आहेत. महिलांना घरून येताना मुलांना सांभाळून, अनेक अडचणींवर मात करत कार्यालय गाठावं लागतं.
मात्र, कार्यालय बंद असल्याचं लक्षात आल्यावर त्यांना निराशेने परतावे लागते.
“आम्ही दोन वेळा आलो, पण कार्यालय उघडलेलं नाही. शेतजमिनीचा दाखला हवा आहे पण काहीच मार्ग दिसत नाही,” अशी प्रतिक्रिया एका महिला नागरिकाने व्यक्त केली.
या प्रकाराबाबत प्रशासनाने त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. तलाठी कार्यालय नियमित सुरु राहावे, नागरिकांच्या तक्रारी वेळेवर सोडवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
प यासीन शेख 9423391215 तिनिधी
