Homeव्हिडिओ बातम्याग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे देताना महिला ग्रामसेवक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्या ...
ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे देताना महिला ग्रामसेवक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्या देवदैठण ग्रामपंचायत अंतर्गत मोठ्ठया गैरव्यवहाराची चर्चा ग्रामसभा अर्धवट ; पुन्हा ग्रामसभेची घेण्याची ग्रामस्थांची मागणी
ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे देताना महिला ग्रामसेवक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्या
देवदैठण ग्रामपंचायत अंतर्गत मोठ्ठया गैरव्यवहाराची चर्चा
ग्रामसभा अर्धवट ; पुन्हा ग्रामसभेची घेण्याची ग्रामस्थांची मागणी
जामखेड प्रतिनिधी
ग्रामसभेत ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे देताना महिला ग्रामसेवकाच्या मनावर ताण आला .चक्कर येऊन ग्रामसेवक बेशुद्ध पडल्याची घटना घडली आहे .बऱ्याच वेळानंतर उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले .सदर गंभीर घटना जामखेड तालुक्यातील देवदैठण येथे दि २६ आँगस्ट रोजी ग्रामसभेत घडली. या गंभीर घटनेची चर्चा तालूका भर चालू आहे मात्र तालूका प्रशासन शांत कसे ? हा प्रश्न आहे .
काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे गावात १७ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामसभेत झालेल्या वादानंतर व मारहाणीच्या धक्क्याने ग्रामसेवक प्रल्हाद पाटील (वय ५२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.त्यांनतर ग्रामविकास अधिकाऱ्यांना व महसूल कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याची व ग्रामसभा न घेण्याचे संघटनांनी सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. शासनाचे ग्रामपंचायत प्रशासनाला ग्रामसभा घेण्याचे आदेश दिलेले आहेत
.त्यानुसार देवदैठण येथे दि २६ आँगस्ट रोजी सरपंच तथा प्रशासक सौ हर्षदा संतोष महारनवर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.या ग्रामसभेत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या विविध समस्यांवर चर्चा केली .दरम्यान ग्रामपंचायत योजनेतून तसेच विविध योजनेतून झालेल्या कामांबाबत व बिलांबाबत चर्चा करत विचारणा केली .ग्रामस्थांमधून राजकीय लोकांचे काही आरोप प्रत्यारोप सुरू झाले . 
झालेली नाहीत मग कामाची बीलं कसे काढले असे ग्रामस्थांनी सरळ सरळ प्रश्न विचारले . लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ग्रामसेवकाच्या मनावर ताण आला .यामध्ये त्यांना चक्कर येऊन बेशुद्ध पडल्या . ग्रामस्थांनी काही वेळानंतर उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले . 
———चौकट —–
या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात . एका प्रशासकीय अधिकाऱ्यावर बेतलेल्या गंभीर प्रसंगावर गटअधिकारयांनी अद्याप काहीच वक्तव्य का केले नाही ? .तहसील प्रशासनही गप्प का ?
देवदैठण ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विकासकामांचे बीले /देयकाबाबत मोठा गैरव्यवहार झाला आहे का ?.ग्रामपंचायत प्रशासनावर नेमका कोणाचा दबाव आहे ? सदर घटनेचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे . देवदैठण ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामांमधून मोठा आर्थिक भ्रष्टाचार झाला आहे.विविध योजनेचे नाव घेत ग्रामस्थांमधून मोठी गंभीर चर्चा ऐकायला मिळत आहे.

सदर ग्रामसभा अर्धवट झाली असुन ती पुन्हा ग्रामसभा घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे .ग्रामपंचायत मध्ये झालेल्या सर्व गैरकारभाराची माहिती सार्वजनिक करण्याची ग्रामस्थांनी केली आहे .
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!