Homeव्हिडिओ बातम्याकैद्यांना नाशिक येथे हलवले ; नातेवाईकांची मोठी गर्दी अनेकांच्या डोळ्यात...

कैद्यांना नाशिक येथे हलवले ; नातेवाईकांची मोठी गर्दी अनेकांच्या डोळ्यात आश्रु दाटले जामखेड दुय्यम कारागृह कायम बंद कैद्यांचा आता नाशिकला मुक्काम

६२ कैद्यांना नाशिक येथे हलवले ;

नातेवाईकांची मोठी गर्दी अनेकांच्या डोळ्यात आश्रु दाटले

जामखेड दुय्यम कारागृह कायम बंद कैद्यांचा आता नाशिकला मुक्काम:

जामखेड प्रतिनिधी

जामखेड कारागृहात न्यायालयीन कोठडी साठी असलेले दुय्यम कारागृह शासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले आहे .या कारागृहांतील ६२ कैद्यांना पोलीस बंदोबस्तात नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले आहे.

.या पूढे जामखेड येथील न्यायालयीन कोठडी सुनावली गेलेल्या कैद्यांना नाशिक येथेच ठेवण्यात येणार आहे . जामखेड कैदेत असतांना पहाणे सहज शक्य होते मात्र नाशिकला पहायला जाणे नातेवाईकांना शक्य नाही यामुळे कैद्यांना नाशिकला जातांना पाहण्यासाठी नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती .अनेकांच्या डोळ्यात आश्रु तर अनेकांना कंठ दाटून आला होता .राज्य शासनाने सुरक्षेच्या दृष्टीने तसेच जीर्ण अवस्थेतील कारागृहांचा विचार करून महाराष्ट्रातील सर्व ११६ दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी कारागृहांची इमारत जीर्ण झाल्याने तसेच कैदी पळून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार या कारागृहांतील सर्व कैद्यांना जवळच्या जिल्हा किंवा मध्यवर्ती कारागृहात टप्प्याटप्प्याने स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.याच निर्णयाची अंमलबजावणी करत जामखेड येथील दुय्यम कारागृहातील एकूण ६२ आरोपींना ९ जुलै रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास पोलिस वाहनांच्या ताफ्यातून नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले. या आरोपींमध्ये ५९ पुरुष आणि ३ महिला आरोपींचा समावेश होता.

स्थलांतराच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जामखेड कारागृह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. आरोपींना नाशिककडे रवाना करताना त्यांच्या नातेवाईकांनी कारागृहाबाहेर उपस्थित राहून निरोप दिला. या वेळी अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याचे भावनिक चित्र दिसत होते .

या स्थलांतर प्रक्रियेदरम्यान सर्व प्रशासकीय व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी तसेच खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

राज्य शासनाच्या धोरणानुसार दुय्यम कारागृहांचे कामकाज टप्प्याटप्प्याने बंद करून कैद्यांचे स्थलांतर मोठ्या व अधिक सुरक्षित कारागृहांमध्ये करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जामखेड येथील दुय्यम कारागृहाचे कामकाज कायमस्वरूपी बंद करण्यात आले असून, यापुढे येथील न्यायालयीन कोठडीतील सर्व आरोपींना नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात येणार आहे.

यावेळी कैद्यांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते .जामखेडला असतांना सहज भेटणे शक्य होते .मात्र नाशिकला भेटायला जाणे शक्य नाही त्यामुळे अनेकांच्या डोळ्यात आश्रु दाटून आलेले दिसत होते.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!