Homeव्हिडिओ बातम्याकृषी साहित्य विक्रेता राज्यव्यापी बेमुदत संप. जामखेड तालुक्यातील सर्वांनी सहभागी व्हावे-उदय शिंदे...

कृषी साहित्य विक्रेता राज्यव्यापी बेमुदत संप. जामखेड तालुक्यातील सर्वांनी सहभागी व्हावे-उदय शिंदे पाटील

कृषी साहित्य विक्रेता राज्यव्यापी बेमुदत संप

जामखेड तालुक्यातील  सर्वांनी सहभागी व्हावे-उदय शिंदे पाटील

जामखेड प्रतिनिधी

राज्यातील कृषी साहित्य विक्रेत्यांच्या कृषी निविष्ठा विक्री व्यवसायातील प्रलंबित अडचणी संबंधी राज्याच्या कृषी विभागाकडून कार्यवाही होत नसल्यामुळे कृषी साहित्य विक्रेत्यांचा दिनांक २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत विक्री केंद्र बंद राज्यव्यापी आंदोलनाचे आयोजन केले असून अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कृषी विक्रेत्यांनी या बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन जामखेड तालुका सिड्स,पेस्टिसाइड्स अँड फर्टीलायझर्स डीलर्स असोसिएशनचे जामखेड तालुका अध्यक्ष उदय पाटील यांनी केले आहे.
कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या बियाणे रासायनिक खते व कीटकनाशके विक्री व्यवसायातील अडीअडचणीवर कार्यवाही करण्यासंदर्भात गेली अनेक वर्षापासून राज्य संघटना मागणी करत असून याबाबत कृषी विभागाकडून कसलीच दखल घेतली जात नसल्याने सदर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे कृषिमंत्री, राज्याचे प्रधान सचिव (कृषी), राज्याचे सन्माननीय आयुक्त साहेब,राज्याचे कृषी संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग यांच्याकडे गेली चार ते पाच वर्षापासून संघटना पाठपुरावा करत असून आम्ही केलेल्या मागण्याबाबत राज्याच्या कृषी विभागाकडून अडचणी सोडवण्याचा कसलाच प्रयत्न दिसत नसल्याने आता आंदोलन करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही म्हणूनच आज नाही तर कधीच नाही,राज्यातील सर्व कृषी विक्रेत्यांनी या बेमुदत संपामध्ये सहभागी व्हावे.
यामध्ये कृषी विक्रेत्यांच्या प्रमुख मागण्या याप्रमाणे आहेत. * कंपन्याकडून रासायनिक खताचा पुरवठा होत असताना लिंकिंग बंद होणे बाबत
* शेजारील राज्यातून येणारे अप्रमानीत एचटीबीटी कपाशी बियाणे प्रतिबंधित होणे बाबत.
* प्रमाणित बियाणे या संदर्भात साथी पोर्टलचा वापराची विक्रेत्यावर शक्ती न करता साथी पोर्टल बियाणे उत्पादक व पुरवठादार कंपनी स्तरावर पर्यंत राबवणे.
* रासायनिक खताचा पुरवठा (FOR)पद्धतीने व्हावा.
* विक्रेते बियाणे पुरवठादार कंपन्याकडून शील बंद पॅकिंग मध्ये खरेदी करून शेतकऱ्यास शील बंद पॅकिंग मध्येच विक्री करत असल्यामुळे तपासणीमध्ये बियाणे सॅम्पल फेल गेल्यास विक्रेत्यास आरोपी न करता साक्षीदार करावे.
* राज्याच्या कृषी विभागाकडून गुणवत्ता तपासणीसाठी घेतलेल्या सॅम्पलच्या प्रलंबित रकमा शासनाकडून तात्काळ देण्यात याव्यात.
* विक्री केंद्राची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची असलेली संख्या पंधरा वरून कमी करण्याचे आदेशाची अंमलबजावणी करावी.
* खरीप हंगाम २०२६ मध्ये राज्यातील युरिया व डीएपी खताच्या वितरणाबाबतची कार्यपद्धती बाबतच्या सूचना परिपत्रकाचा फेरविचार व्हावा.
* मुदत बाह्य कीटकनाशके पुरवठादार कंपनी विक्रेत्याकडून परत जमा करून घ्यावीत.
* शेजारील राज्यातून येणारी दुय्यम दर्जाची अवैद्य कीटकनाशके,तणनाशके तसेच बायो पेस्टिसाइड,बियाणे रासायनिक खते शेतकऱ्यास विक्री करणे प्रतिबंधित होणे.
* केंद्र शासनाचे कृषी विभागाकडून नवीन बियाणे कायदा २०२५मधील विक्रेत्यासाठी जाचक नियम शिथील करणे.
विक्रेत्यांच्या वरील सर्व अडीअडचणी सोडवण्यासाठी कृषी विभागाकडून ठोस निर्णय होत नसल्याने जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्र चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थतेची व नाराजीची भावना असल्यामुळे या सर्व अडचणींचा निर्णय न झाल्यास नाईलाज म्हणून जिल्ह्यातील सर्व विक्री केंद्र दिनांक २७ एप्रिल २०२६ पासून अमर्याद काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत अशा प्रकारचे निवेदन मा.तहसीलदार साहेब जामखेड,मा.तालुका कृषी अधिकारी जामखेड यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. याप्रसंगी संघटनेचे तालुकाध्यक्ष उदय पाटील,संघटनेचे सचिव शंतनूराजे निंबाळकर,उपाध्यक्ष सुनील चोरडिया त्याचप्रमाणे राजेंद्र राऊत,देविदास वीर,सुरेश महाजन,शितल दोशी आधीसह अनेक कृषी सेवा विक्रेते याप्रसंगी उपस्थित होते.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!