जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुसार मालाचे खूले लिलाव करण्यात येणार आहेत त्या प्रक्रियेच्या नियोजनासाठी माल १७ ते १९ फेब्रुवारी रोजी जामखेडचे बाजार समितीचे लिलाव बंद राहणार असून सदर कालावधीत भुसार मालाचे लिलाव होणार नाहीत. अशी माहिती जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकरी हितासाठी नेहमीच अग्रेसर असते. त्या अनुषंगाने सभापती झाल्यापासून शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यानुसार दि. १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान बाजार समितीच्या वतीने आगामी काळात भुसार मालाचे ओपन लिलाव करण्यासाठी भुसार ओपन लिलाव प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी दि. १७ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२४ असे तीन दिवस भुसार लिलाव बंद राहणार आहेत. लिलाव बंद असल्याने जामखेड बाजार समितीत शेतमाल (भुसार) घेऊन येणारे शेतकरी व खरेदीसाठी येणारे व्यापारी यांची गैरसोय होऊ नये. यासाठी प्रसिद्ध पत्रकाव्दारे हे आवाहन करण्यात येत असल्याचे सभापती पै. शरद कार्ले यांनी सांगितले.
१७ फेब्रुवारी ते १९फेब्रवारी पर्यंत भुसार लिलाव बंद :- सभापती शरद कारले
RELATED ARTICLES