सरपण जनावरांचा भूसा का पेटवला
विचारल्याने सरपंच पतीवर हल्ला
दोन जणांना अटक
जामखेड प्रतिनिधी
. जामखेड तालुक्यातील जातेगाव ग्रामपंचायतच्या महीला सरपंचाच्या पतीवर हल्ला केला असून याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
खर्डा पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी गणेश पांडुरंग गायकवाड. वय-४५ वर्षे. धंदा-शेती. रा-जातेगाव यांनी म्हटले आहे की, शेतातील जनावरांचा भुसा तसेच सरपण का पेटवले याचा जाब विचारल्यामुळे गंचाडी धरून दमदाटी केली. त्यानंतर आम्ही खर्डा येथे तक्रार दाखल करण्यासाठी जात असताना वाटेत मोटारसायकलला आडवे येऊन आरोपी युवराज अमृत पाटील, शिवराज कमलाकर पाटील,रविराज कमलाकर पाटील, अमृत भिकाजीराव पाटील सर्व रा-जातेगाव. ता-जामखेड. जि – अहिल्यानगर यांनी दगड लाथाबुक्यांनी तसेच कुऱ्हाडीच्या तुंब्याने जीवघेणा हल्ला केला यामध्ये फिर्यादी गणेश पांडुरंग गायकवाड व त्यांचे वडील पांडुरंग किसन गायकवाड हे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर जामखेड येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.यातील आरोपी युवराज गायकवाड पाटील व रविराज गायकवाड पाटील यांना खर्डा पोलीसांनी अटक केली आहे. आरोपींना अटक करण्याकामी पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संभाजी शेंडे, पोलीस अंमलदार पंडित हंबर्डे, शशिकांत म्हस्के, विष्णू आवारे यांनी कार्यवाही केली.
रविवार दि. २ रोजी जातेगाव येथे फिर्यादी हे आरोपी क्र.3 यास तु शेतामधील सरपण पेटविल्यामुळे आमच्या शेतामधील जनावरासाठी ठेवलेला भुसा जळाला आहे असे समजावुन सांगत असताना पांडुरंग गायकवाड यांची गचांडी धरली होती.
त्यानंतर फिर्यादी व त्यांचे वडील हे मोटार सायकल वरून खर्डा येथे जात असताना यातील आरोपींनी मोटार सायकल आडवी लावुन फिर्यादी त्यांच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी, कु-हाडीच्या तुंब्याने मारून गंभीर दुखापत केली. ते मोठमोठ्याने ओरडल्याने आरोपी पळुन गेले.
वरील घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी शेंडे करत आहेत.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215