समाजसेवक निलेश गायवळ यांचा वाढदिवस वृध्दाश्रमात साजरा
जामखेड प्रतिनिधी
समाजसेवक व जामखेड तालुक्याचे भूमिपुत्र व समाजसेवक निलेश भाऊ गायवळ यांचा वाढदिवस दि१६ मार्च रोजी खर्ड्या जवळील नळी वडगाव येथील वृद्धाश्रमात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व वृध्द लोकांची डॉक्टर बिपिनचंद्र लाड यांनी आरोग्य तपासणी केली व त्यांना आजाराप्रमाणे औषध उपचार देण्यात आले, त्यानंतर सर्व उपस्थितांना अल्पोहार जेवण देण्यात आले.
सामाजिक क्षेत्रात काम करीत आसताना निलेश भाऊंनी यापूर्वी अनेक गरजू व्यक्तींना मदतीचा हात दिला आहे. कोरोनाच्या काळात आरोग्याची काळजी घेण्यासाठी लागेल ती यंत्रणा त्यांनी पोहोच केली यामध्ये डॉ आरोळे यांच्या हॉस्पिटलला कोरोना असलेल्या पेशंटसाठी औषध उपचार दिले. हाताला काम नसलेल्या लोकांना किराणा व भाजीपाल्याचे वाटप केले. त्याचबरोबर विविध प्रकारची मदत कार्य तालुक्यातील अनेक व्यक्तींसाठी केले आहे. या सर्व घटनेचा जामखेड तालुका साक्षीदार आहे. त्याचबरोबर दुष्काळात पाणी वाटपाचे काम असो किंवा दवाखान्यात संकटात सापडलेल्या माणसाला व त्याच्या कुटुंबाला हातभार लावण्याचे काम त्यांनी केले होते, तसेच आजही त्यांचे समाजसेवेचे काम सुरू आहे.
कार्यक्रमाच्या नंतर निलेश भाऊंना वाढदिवसाच्या सर्वांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील साळुंखे, बापू ढगे, बाला भैसडे, नीरज पवार, ग्रामीण विकास केंद्र खर्डा येथील संसाधन केंद्राच्या रेखाताई पवार, भूम येथील सामाजिक कार्यकर्त्या क्षीरसागर मॅडम,इत्यादी सह वृद्धाश्रमातील सर्व वयस्कर महिला व पुरुष उपस्थित होते.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215