Homeव्हिडिओ बातम्याशेती औजारे व मशिनरी विक्री युनियनच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी सुनिल कोठारी, सचिवपदी ओंकार...
शेती औजारे व मशिनरी विक्री युनियनच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी सुनिल कोठारी, सचिवपदी ओंकार पवार, उपाध्यक्षपदी जुबेरखान व शिवप्रसाद कोळपकर
शेती अवजारे व मशिनरी विक्री युनियन असोसिएशनच्या जामखेड तालुका अध्यक्षपदी सुनिल कोठारी:
सचिवपदी ओंकार पवार तर उपाध्यक्षपदी जुबेरभाई खान व शिवप्रसाद कोळपकर यांची निवड:

जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथे नुकतीच शेती अवजारे व मशिनरी विक्रि करणारया दुकानदारांनी एकत्र येऊन युनियन असोशिएशनची स्थापना केली आहे .
यामध्ये जामखेड तालुकाध्यक्षपदी माजी सरपंच व प्रसिद्ध व्यापारी सुनिल कोठारी यांची निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी ओंकार पवार तर उपाध्यक्षपदी जुबेरभाई खान व शिवप्रसाद कोळपकर यांची निवड करण्यात आली. विषेश म्हणजे या निवडीवेळी प्रत्येक महीन्याच्या पहिल्या बुधवारी शेती अवजारे व मशिनरीची दुकाने बंद ठेवण्याचा सर्वानुमते निर्माण घेण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सुनिल कोठारी यांनी सांगितले की युनियन ची स्थापना करण्याचा उद्देश म्हणजे युनियनच्या एकजुटीचा फायदा काय होतो हे माहीत होण्यासाठी, तसेच अनेक वेळा व्यापार्यांनावर हल्ले होतात याला विरोध करण्यासाठी एकजुट महत्त्वाची असते व सर्वांनी कुटुंबाप्रमाणे रहावे या उद्देशाने या असोशिएशन ची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती दिली.
यावेळी सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष सचिव व उपाध्यक्ष यांना व्यापार्यांच्या वतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी व्यापारी उमाकांत अंदुरे, बापु जरे, आशोक बाफना, बंडु गव्हाणे, दत्तात्रय हजारे, माऊली गोरे, नितिन बाफना, अमोल नगरे, सनी बांदल, रोशन बाफना, सचिन बेद्रे, निलेश डांगे, राकेश गुप्ता, राजु शेख, सोनु टेकाळे, कांतीलाल वाळुंजकर, मारुती लाड, पप्पु पवार भागवत जायभाय, बापु वाळुंजकर व रविंद्र शेळके सह अनेक व्यापारी उपस्थित होते.


प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!