Homeव्हिडिओ बातम्यावीज तारेला चिटकून बापलेकाचा मृत्यू : पावसामुळे तुटलेल्या तारांकडे वीज कंपनी कर्मचाऱ्यांचे...

वीज तारेला चिटकून बापलेकाचा मृत्यू : पावसामुळे तुटलेल्या तारांकडे वीज कंपनी कर्मचाऱ्यांचे दूर्लक्ष

विजेच्या तारेला चिटकून बापलेकाचा मृत्यू
बाळगव्हाण येथील दूर्दैवी घटना

तुटलेल्या तारांकडे विज वितरण कंपनीचे दूर्लक्ष

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील (शिकारे वस्ती) ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब दौलत शिकारे (वय ४२ ) व त्यांचा मुलगा महेश काकासाहेब शिकारे (वय १५ ) हे दोघे बापलेकाचा शेतामध्ये तुटलेल्या वीज प्रवाहशी संपर्क झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे. १५ दिवसांपुर्वी झालेल्या वादळात तुटलेल्या तारा बाबत ग्रामस्थांनी विज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगितले होते. मात्र त्या तारा तशाच राहिल्या वीज मंडळाच्या गलथान कारभारामुळे बापलेक जीवाला मुकले असे ग्रामस्थांनी सांगितले.
याबाबत समजकेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील शिकारे वस्ती येथील बाळगव्हाण ग्रामपंचायतचे सदस्य काकासाहेब दौलत शिकारे व त्यांचा मुलगा महेश काकासाहेब शिकारे हे दि २३ जून रोजी शेतामध्ये खते टाकण्यासाठी गेले असता त्यांचा तुटलेल्या वीज प्रवाहशी संपर्क झाला असता या दोघांचा मृत्यू झाला. संध्याकाळी हे बापलेक घरी परतले नाहीत. म्हणून कुटुंबाने व काही ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता त्यांचे शेतामध्ये मृतदेह विजेच्या तुटलेल्या तारे जवळ दिसून आले. असे शिकारे वस्ती व बाळगव्हाण ग्रामस्थांचे म्हणणे आहे.त्यांच्या दुर्लक्षामुळे या बाप लेकाचा बळी गेल्याचा त्यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे. याबाबत जबाबदार वीज मंडळाच्या अधिकाऱ्यावर चौकशी करून मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गामध्ये व्यक्त केली जात आहे.
तघटनेची माहिती समजली असता खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी घटनास्थळाला भेट देऊन पुढील कारवाई करून तपास सुरू केला आहे. सध्या पावसाळा सुरू आहे.वारया वादळामुळे विजेचे खांब कींवा तारा शेतात पडल्याच्या घटना घडतच असतात. तेव्हा ग्रामस्थ शेतकरी विद्यार्थी सर्वांनी लक्ष देऊन शेतात येजा करतांना काळजी घेण्याची गरज आहे. प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!