Homeव्हिडिओ बातम्यावाढला मतदान टक्का; कुणाला धक्का;* *७५.१५% टक्के मतदान; कोणाचे...

वाढला मतदान टक्का; कुणाला धक्का;* *७५.१५% टक्के मतदान; कोणाचे जड पारडे करणार?

जामखेड प्रतिनिधी
कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत यावेळी ७५.१५% एवढे मतदान झाले आहे. हा वाढता मतदान टक्का कोणाला धक्का देणार, कोणाला तारणार याबाबत गटागटामध्ये वेगवेगळी चर्चा ऐकायला मिळत आहे. मात्र वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात गेले त्याचा निकाल ऐकण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील एकुण मतदार संख्या
पुरूष – १८१५२८ व
स्त्री – १६५७७५ अशी ३७७३०३ इतकी आहे तर ३५६ मतदान केंद्रांवर सकाळपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या मतदान ७५.१५% इतके मतदान झाले. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.
बडे नेते, उमेदवार, व शहरातील अनेक मान्यवरांनी कुटुंबीयांसह सकाळच्या पहिल्या दोन टप्प्यातच मतदान केले.
सर्व ठिकाणी मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहण्यास मिळाले. ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक व युवती यांनी उत्साहाने मतदान केल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. तालुक्यात मोठ्या संख्येने नवमतदार होते.

त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच मतदान करण्याचा आनंद दिसून येत होता.शहरासह ग्रामीण भागातही लांबच लांब रांगा लागल्या होत्या.कार्यकरत्यांनी घराघरापर्यत जाऊन लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त केले. वाढलेले मतदान हे उमेदवारांच्या कार्यकर्तेच यश आहे

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!