Homeव्हिडिओ बातम्यावडीलांच्या स्मृतींप्रितीर्थ ज्ञानाची अक्षर श्रद्धांजली जिल्हा परिषद फक्राबाद शाळेतील विद्यार्थ्यांनी १०० पुस्तकांची...

वडीलांच्या स्मृतींप्रितीर्थ ज्ञानाची अक्षर श्रद्धांजली जिल्हा परिषद फक्राबाद शाळेतील विद्यार्थ्यांनी १०० पुस्तकांची भेट

वडीलांच्या स्मृतींप्रितीर्थ ज्ञानाची अक्षर श्रद्धांजली

फक्राबाद जिल्हा परिषद शाळेच्या ग्रंथालयाला  १०० पुस्तकांची भेट…

ज्ञानोपयोगी पुस्तकचेलां मुलांना वाटप

जामखेड प्रतिनिधी

बाप म्हणजे घराचं छप्पर आणि संस्कारांची शिदोरी.. त्याच वडिलांनी आयुष्यभर जो विचार पेरला तोच जिवंत ठेवण्यासाठी फक्राबादचे शिंदे कुटूंब सरसावले. शिंदे कुटूंबातील तिघा भावंडांनी स्वर्गवासी पित्याला साध्या हार-फुलांची नव्हे, तर चक्क ‘ज्ञानाची’ अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.

जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील ज्येष्ठ शिक्षण प्रेमी नागरिक स्व.श्रीधर लहानू शिंदे यांच्या प्रथम वर्षेश्राद्धनिमित्त त्यांच्या कुटुंबीयांकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फक्राबाद या शाळेतील शाळा ग्रंथालय समृद्धी अंतर्गत बालवाचनालयासाठी १०० पुस्तकांची भेट दिली. वडिलांच्या स्मृती जपण्याचा हा ‘अक्षर जागर’ सध्या पंचक्रोशीत कौतुकाचा आणि प्रेरणेचा विषय ठरत आहे.”जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील स्व. श्रीधर लहानू शिंदे हे फक्राबाद येथील शिक्षणप्रेमी नागरिक, वृत्तपत्र विक्रेत होते. त्यांनी वाचनाची आवड गावाला लावली. गेल्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धनिमित्त त्यांच्या मुलांनी फक्राबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बालवाचनालयासाठा १०० पुस्तके भेट देऊन ‘अक्षर श्रद्धांजली’ वाहिली आहे.

आजच्या डिजिटल युगात मुलांमध्ये वाचनाची गोडी कमी होत चालली आहे. हीच बाब लक्षात घेऊन, स्व. श्रीधर शिंदे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांचे चिरंजीव गणेश शिंदे सर, महेश शिंदे आणि मुकेश शिंदे यांनी शालेय ग्रंथालय समृद्धी अंतर्गत ही पुस्तके प्रदान केली.यावेळी भावना व्यक्त करताना गणेश शिंदे सर म्हणाले की, “माझ्या वडिलांना पुस्तके आणि वर्तमानपत्रे वाचण्याची प्रचंड आवड होती. त्यांच्या याच आवडीतून प्रेरणा घेऊन आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी, या उद्देशाने आम्ही ही पुस्तके शाळेला दिली आहेत. पुस्तकांमुळे मुलांची शैक्षणिक प्रगती होईल, हाच आमचा खरा आनंद आहे.”

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-शिंदे कुटुंबाच्या या उपक्रमाचे गावकऱ्यांमधून आणि शिक्षण क्षेत्रातून मोठे कौतुक होत आहे. राजीव मडके सर यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी अनावश्यक खर्च टाळून ज्ञानाची कवाडे उघडी करून देणे, हा आदर्श सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.”

यावेळी माजी विद्यार्थी विचार मंच अध्यक्ष योगीनाथ जायभाय पाटील, शरद उबाळे, महेंद्र जायभाय, राजीव मडके सर, मोहिनीराज आढाव, संतोष राऊत, परसराम राऊत,तसेच मोहिनीराज आढाव, संतोष राऊत, परसराम राऊत, नितीन आढाव, हजारे सर, चौधरी सर यांच्यासह ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फक्राबाद शाळेतील विद्यार्थ्यांनी या नवीन पुस्तकांचे उत्साहाने स्वागत केले असून, यामुळे शाळेचे ग्रंथालय अधिक समृद्ध झाले आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!