लोकोपयोगी उपक्रम राबवणारे अमित चिंतामणी होय!
हजारो महिलांना मोहटादेवी दर्शन यात्रेचा दिला मोफत लाभ:
जामखेड प्रतिनिधी
सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे नगरसेवक अमित चिंतामणी यांनी सालाबादप्रमाणे या वर्षीही नवरात्र निमित्ताने जामखेड शहरातील महिलांसाठी मोफत मोहटादेवी दर्शन यात्रेचे मोफत आयोजन केले आहे. मोफत देवी दर्शन उपक्रमाचे हे ११ वे वर्षे आहे.
सभापती प्रा. राम शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे शारदिय नवरात्र उत्सवाचे आयोजन केले असून त्या अंतर्गतच दि. २४ सप्टेंबर रोजी ६० गाड्यांमधुन महिलांनी मोहटादेवी दर्शनासाठी रवाना केले आहे असे नगरसेवक अमित चिंतामणी यांनी सांगितले.
यावेळी बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, पं.स. माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, नगरसेवक अमित चिंतामणी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी बाजार समिती उपसभापती नंदकुमार गोरे, बाजीराव गोपाळघरे. जिल्हा उपाध्यक्ष अजय काशीद, माजी संचालक पोपट नाना राळेभात, संजय राऊत, प्रविण चोरडिया, संचालक विष्णू भोंडवे, डॉ. अल्ताफ शेख, अॅड. प्रवीण सानप, आनंद ढवळे, भाजपा युवा नेते तात्याराम पोकळे, गणेश काळे, नारायण जायभाय, उमेश देशमुख, आदी मान्यवरांसह भाविक भक्त व महिला उपस्थित होत्या.
नगरसेवक चिंतामणी यांच्या वतीने होत असलेल्या शारदिय नवरात्र उत्सवाचे हे ११ वे वर्षे असून जामखेड शहरातीलमहिला भगिनींसाठी
नेहमीच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
यावर्षी या कार्यक्रमाची धुरा अमित चिंतामणी यांच्या सौभाग्यवती प्रांजलताई अमित चिंतामणी यांनी घेतली आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी देशमुख गडी येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून मोहटादेवी दर्शनासाठी महिलांसोबत प्रस्थान केले.
महिला भगिनींनी नवरात्रोत्सवा दरम्यान होणाऱ्या सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन प्रांजलताई अमित चिंतामणी यांनी केले आहे. अमित देशमुख यांच्या यांनी राबविलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
