🔸 कर्जत व जामखेड मध्ये “नमो उद्यान” उभारणीसाठी २ कोटींचा भरीव निधी मंजूर.
🔸 महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने “वैशिष्ट्यपूर्ण” योजनेअंतर्गत, कर्जत नगरपंचायतसाठी १ कोटी व जामखेड नगरपरिषदसाठी १ कोटी असा एकूण २ कोटी रुपयांचा भरीव निधी कर्जत – जामखेड मतदार संघासाठी मंजूर केला आहे. या निधीतून दोन्ही शहरांमध्ये भव्य “नमो उद्यान” उभारण्यात येणार आहे.
🔸 या उद्यानामुळे कर्जत व जामखेड शहरातील :
🔹 नागरिकांना आधुनिक, हिरवाईने नटलेले आणि सुसज्ज उद्यानाची सुविधा मिळणार आहे.
🔹 मुलांसाठी खेळाची साधने, नागरिकांसाठी व्यायामाचे साहित्य, वॉकिंग ट्रॅक व विश्रांतीची सोय उपलब्ध होणार आहे.
🔹 पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळून, शहरातील जीवनमान अधिक आरोग्यदायी व समृद्ध होणार आहे.
🔹 शहर सौंदर्यीकरणाबरोबरच सामाजिक एकात्मता व नागरीकांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडणार आहे.
🔸 “नमो उद्यान” या महत्त्वापूर्ण प्रकल्पास मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व नगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांचे मनःपूर्वक आभार..!
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
