Homeव्हिडिओ बातम्यालग्नात सत्काराला नाव पुकारले नाही .तलाठ्याने माईक मारला डोक्यात .ग्रामपंचायत सदस्य जखमी

लग्नात सत्काराला नाव पुकारले नाही .तलाठ्याने माईक मारला डोक्यात .ग्रामपंचायत सदस्य जखमी

लग्नात सत्काराला नाव पुकारले नाही .

तलाठ्याने माईक मारला डोक्यात

ग्रामपंचायत सदस्य जखमी

जामखेड प्रतिनिधी
भांडण कोणत्या कारणाने  कधी होईल याचा भरोसा नाही.

.लग्नामध्ये सत्कारप्रसंगी नाव न घेतल्याचा राग आला आणि तलाठ्याने बोलण्याचा माईक हिसकावून ग्रामपंचायत सदस्याच्या डोक्यात मारल्याची घटना जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथील एका लग्नाच्या वेळी मंगलकार्यालयात घडली .यामध्ये ग्रामपंचायत सदस्य आशोक पठाडे जखमी झाले आहेत .याप्रकरणी तलाठी शिवाजी सखाराम हजारेविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गून्हा दाखल करण्यात आला आहे .

फिर्यादी अशोक रामचंद्र पठाडे, वय ३७ वर्षे , व्यवसाय शेती, रा. जवळा ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की
जवळा गावातील बिभीषण शिवाजी लेकुरवाळे यांच्या मूलीचे लग्न राजेवाडी येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे होता. त्या लग्नाकराता मी उपस्थित राहून येथे लग्नाकरीता आलेल्या नातेवाईक व गावातील लोकांचे माईकवरून स्वागत करीत अस्ताना, शिवाजी सखारामे हजारे हे दि. ११:७/२०२५ रोजी दुपारी १२.३० वा. चे सुमारास दारु पिऊन माझे जवळ आले व शिवीगाळ करून हाताने माझे तोंडावर मारुन मला म्हणाले की, तु माझे स्वागत करणेकरीता माझे नाव माईकवर का पुकारले नाही, असे म्हणून त्यांनी माझे हातामधील लोखंडी रॉड असलेला माईक हिसकावून घेवून त्या माईकने माझ्या डोक्यात हाणून जखमी केले व म्हणाले की, “मादरचोद तु लई माजला का, मी तुला खलास करून टाकीन ” अशी मला धमर्की दिली आहे. त्यावेळी जीवन मोहन रोडे, तानाजी लक्ष्मण पवार, प्रशांत भाऊसाहेब पवार हे तेथे आले व त्यांनी मला त्यांचे तावडीतून सोडविले.
त्यानंतर तो तेथून पळून गेला आहे. प्रशांत मारुती शिंदे यांनी मला त्यांचे गाडीत घेवून ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे उपचारासाठी दाखल केले होते.
आशोक रामचंद्र पठाडे यांच्या फिर्यादीवरून शिवाजी सखाराम हजारोंच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे .पुढील तपास करीत पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ तुकाराम सोनवणे हे करत आहेत .

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!