शंभुराजे कुस्ती संकुलचा सामाजिक उपक्रम*
जामखेड प्रतिनिधी
शंभुराजे कुस्ती संकुलाच्या वतीने
स्वराज्याचे देखणे स्वप्न सत्यात साकार करणारया राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी जयंतीदिनाचे औचित्य साधून दि १२जानेवारी रोजी शंभुराजे कुस्ती संकुल च्या वतीने मंगेश आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबीरात १२१ जणांनी रक्तदान केले. जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले .यावेळी सर्व समाजातील लोकांनी रक्तदान शिबीरात सहभाग नोंदवला. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे हे सातवे वर्ष आहे. पारंपरिक पध्दती, मिरवणूक आदिंना फाटा देत सामाजिक उपक्रम राबवत जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शहरासह तालुक्यातील नागरिक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .