Homeव्हिडिओ बातम्यारहीमुन्नीसा कमाल शेख यांनी भरला आम आदमी पार्टीकडुन नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज :...

रहीमुन्नीसा कमाल शेख यांनी भरला आम आदमी पार्टीकडुन नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज : आम आदमी पार्टीसह दोन अर्ज नगराध्यक्षपदाचे दाखल:आज अर्ज दाखलची गर्दी

रहीमुन्नीसा कमाल शेख यांनी भरला आम आदमी पार्टीकडुन नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज

आम आदमी पार्टीसह दोन अर्ज दाखल

आज अर्ज भरण्याची गर्दी

जामखेड प्रतिनिधी

नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने रहीमुन्नीसा कमाल शेख यांनी नगराध्यक्षपदाचा अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला आहे. १६ तारखेपर्यंत जामखेड नगरपरिषदमध्ये नगराध्यक्ष पदासाठी ४ तर नगरसेवक पदासाठी १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून. यात रहीमुन्नीसा कमाल शेख (आम आदमी पार्टी), शहनाज नय्यूम शेख (प्रहार जनशक्ती पक्ष), शेख परविन सिराजुद्दीन (समाजवादी पार्टी) प्रियांका दिनेश राळेभात (अपक्ष) यांचा समावेश आहे. उदय राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार आहेत.
राष्ट्रावादी व भाजप नगराध्यक्षपदासाठी कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता लागली आहे. सोमवारी (दि.१७) रोजी ३ वाजेपर्यंत एबी फॉर्म द्यावा लागणार आहे. त्या विवंचनेत पक्षांकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले आहे. जामखेड नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या २४ जागांसाठी १० नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिले ३ ते ४ दिवस उमेदवारांनी अर्ज दाखल केले नाहीत मात्र गेल्या दोन दिवसापासून नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी
सत्तेचे समीकरण बदल्याची शक्यता आहे

अर्ज दाखल करण्यासाठी झुबंड उडाल्याचे पहिले मिळाले, नगरसेवकपदासाठी १७ अर्ज दाखल झाले असून यामध्ये सय्यद समीर लतीफ, कदम आशा दीपक, नवलाखा मिठुलाल पोपटलाल, सय्यद जमीर इन्नाहिम, सय्यद नजमा नदीम, पठाण फैमिदा कय्यूमखान, पवार देविदास रावसाहेब, अंधारे गुलचंद हिरामण, पवार लहू सीताराम, पोकळे तात्याराम रोहिदास, डोके संगीता नाना, पवार मोहन सिताराम, गडदे मोहन तुकाराम, डोके श्रीराम आजिनाथ, येवले कल्पना योगेश, शेळके सुमन अशोक, देशमाने महेश बाबासाहेब आदि होते.

दरम्यान यापूर्वी नगराध्यक्षपदासाठी बागवान सलीम नसीम नगरसेवकपदासाठी, उगले राहुल अंकुश, आजबे सखुबाई गणेश यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. अशी माहिती जामखेडनगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी दिली आहे.

भाजप राष्ट्रवादी (अजित पवार ) गटात युती ? तिरंगी लढत

जामखेड नगरपरिषद निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेने बंड पुकारला असून सौ पायलताई बाफना यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे युती मधून शिवसेना बाहेर पडली असून सध्या भाजप राष्ट्रवादी (अजित पवार) युती होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) अद्याप आपली भूमिका जाहीर केली नसून स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी केली असल्याचे बोलले जात आहे कमळ आणि तुतारी चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची झूंबड लागली असून कोणाचा गळयात उमेदवारीची माळ पडते याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!