येवले पती पत्नी प्रभाग ७ मधुन नगरसेवक पदासाठी इच्छुक
सामाजिक कार्य व लोकसंपर्काच्या जोरावर योगेश (शिवा) येवले व कल्पना योगेश येवले तयारीत
जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.सर्वच प्रभागातुन नगरसेवक पदाच्या इच्छूक उमेदवारांच्या इच्छा जाहिर होऊ लागल्या आहेत.
प्रभाग ७ मधून योगेश (शिवा) सूधीर येवले व कल्पना योगेश येवले हे पती पत्नी नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत. त्याअनुषंगाने जनतेशी संवाद साधताना दिसत आहेत. प्रभागातील जनतेच्या सूखदूखात हजर असतो. सामाजिक धार्मिक कार्यात मित्र मंडळींबरोबर अग्रेसर राहून जवाबदारया पार पाडत आहे. कोरोना काळात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अशावेळी अनेक रूग्णांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जामखेड नगरपरिषद प्रभाग क्रमांक ७ मध्ये जागा (अ) सर्वसाधारण महिलेसाठी व जागा क्रमांक (ब) मध्ये सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले आहे.
त्या अनुषंगाने आम्ही दोघे पती पत्नी प्रभाग ७ मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढणार आहोत असे योगेश येवले यांनी सांगितले.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
