Homeव्हिडिओ बातम्यायूवा नेते बाजीराव गोपाळघरे यांची अहिल्यानगर जिल्हा चिटणीसपदी निवड :आता भाजपा यूवा...

यूवा नेते बाजीराव गोपाळघरे यांची अहिल्यानगर जिल्हा चिटणीसपदी निवड :आता भाजपा यूवा मोर्चाची जिल्हास्तरीय जवाबदारी

बाजीराव गोपाळघरे यांची अहिल्यानगर जिल्हा चिटणीसपदी निवड:

आता भाजपा यूवा मोर्चाची जिल्हास्तरीय जवाबदारी

जामखेड प्रतिनिधी

सर्वांना सन्मान देत बरोबर घेऊन काम करण्याची पद्धत तसेच एकनिष्ठ राहून पक्षाचे हिताचे काम करणारे यूवा नेतृत्व बाजीराव गोपाळघरे होय . त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा (भाजपायुमो) अहिल्यानगर जिल्हा चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे .

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील युवा कार्यकर्ते बाजीराव गोपाळघरे हे जनमानसात लोकप्रिय असलेले उभरतं यूवा नेतृत्व आहे .त्यांच्या निवडीमुळे जामखेड तालुक्यासह जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.
बाजीराव गोपाळघरे हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्ष व युवा मोर्चामध्ये सक्रियपणे कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि युवकांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.

त्यांच्या संघटन कौशल्याची, पक्षनिष्ठेची आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या सुसंवादाची दखल घेत त्यांच्यावर जिल्हा चिटणीसपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या निवडीबद्दल पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

बाजीराव गोपाळघरे यांच्या निवडीमुळे युवा मोर्चाचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!