शहरातील चालू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे गेल्या दिड महिन्यांपासून जिजाऊ नगर (रमेश खाडे नगर) रस्त्या बंद होता नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते .परिसरातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांना सांगितले तेव्हा रमेश आजबे यांनी तातडीने दखल घेत संबधितांना संपर्क केला .अन् महामार्गावरील नाली आणि रस्त्याच्या मधील खड्डा भरून काढला .आणि नागरिकांच्या येण्या जाण्याचा मार्ग मोकळा केला .जामखेड शहरातील बस स्थानकासमोरून रमेश खाडे नगर मधून जाणारा रस्ता म्हणजे शहराच्या उत्तर भागातला मोठा बायपास आहे .शहरातील मोठ्या प्रमाणावर नागरिकांची येजा याच रस्त्यावरून होत आहे .मात्र गेल्या काही दिवसांपासून महामार्गाचे काम चालू आहे .नालिचे बांधकाम झाले अन् रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे .त्यामुळे मधला खड्डा दिड महिण्यापासुन भरून काढण्यात आला नाही. त्यामुळे मोटारसायकल, रिक्षा, अंम्बलंन्स,आदींचे जाणे येणे बंद झाले होते .पायी जाणाऱ्या नागरिकांना उड्या मारून जावे लागते .परिसरातील नागरिकांचा हा त्रासाबद्दल सुंदर परदेशी यांनी सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांना फोन करून सविस्तर माहिती दिली .या बाबीची रमेश आजबे यांनी तातडीने दखल घेतली आणि रस्तावरील खड्डा मुरूम टाकुन भरून काढत नागरिकांसाठी रस्ता चालू केला.याला म्हणतात दखल अशी येणारया जाणारया तसेच परिसरातील नागरिकांमधुन चर्चा ऐकायला मिळत आहे .
….याला म्हणतात दखल !
RELATED ARTICLES