Homeव्हिडिओ बातम्यामुरूम कुठे टाकु??: माझा प्रभाग कोणता?? :भावी नगरसेवकांची अनदेखी :पाऊस रस्ता चिखल...

मुरूम कुठे टाकु??: माझा प्रभाग कोणता?? :भावी नगरसेवकांची अनदेखी :पाऊस रस्ता चिखल नाली नागरिक परेशान नगरपरिषदची अनदेखी

मुरूम कुठे टाकू??
माझा प्रभाग कोणता?

भावी नगरसेवकांची अनदेखी ;
पाऊस, रस्ता, चिखल, अस्वच्छता नागरिक परेशान ;

जामखेड प्रतिनिधी

सध्या पावसामुळे शहरातील विविध भागात चिखल मय रस्ता झाला आहे. लोक भावी नगरसेवकांना मुरूम टाकण्याची मागणी करत आहेत. नगरपरिषदचे आरक्षण जाहीर झाले मात्र कोणते कोणत्या प्रभागात पडेल प्रभाग रचना जाहीर होईल हे आद्याप स्पष्ट नाही. मतदारांना आकर्षित करण्यासाठी नागरिक सुविधा देण्याची प्रभात इच्छूकांमध्ये स्पर्धा होते. मात्र सध्या कोणीही मुरूम टाकण्याचा खर्च करण्याची हिम्मत करत नाही. तो प्रभाग आरक्षणानुसार माझ्या उमेदवारीचा नसेल तर खर्च वाया जाईल या भीतीमुळे कुठेही कोणीही इच्छुक मूरूम टाकतांना दिसत नाही.
सध्या सर्वत्र रिमझिम पावसाचे वातावरण आहे. पावसामुळे शहरातील सर्वच भागात रस्ता, चिखल, नाली सर्वांची अवस्था दयनीय आहे. त्यातच नगरपालिकेच्या स्वच्छतेबाबत गलिच्छ कारभार दिसतच आहे.
स्वच्छता नावालाही दिसत नाही. अस्वच्छतेच्या ठिकाणी व रस्त्यावर पडलेले खाचखळगे मुरुमाने भरले तर नागरिकांना येणे जाणे करणे थोडे सूलभ होईल. नागरिकांच्या सोयीसाठी रस्त्यावर अवश्य त्या ठिकाणी मुरूम टाकण्याची भावी नगरसेवकांची तयारी आहे मात्र मूरूम टाकायचा कूठे, कोणत्या प्रभागात, उद्या कोणता प्रभाग माझा असेल माहिती नाही मग उगीच अनाठायी खर्च वाया जाईल या अशा संभ्रमित विचाराने भावी नगरसेवक दिसुन न दिसल्या सारखे वागत आहेत.
नुकतेच द्विसदस्यीय प्रभाग या निर्णयानुसार जामखेड नगरपरिषदेसाठी निवडून येणाऱ्या नगरसेवकांची एकुण संख्या २४ ही निश्चित झाली आहे. त्यापैकी १२ जागा महिलांसाठी राखीव असणार आहे. त्यानुसार जाहिर झालेल्या जागांनुसार ३ जागा अनुसूचित जातींसाठी, १ एक जागा अनुसूचित जमातीसाठी, ६ जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असणार आहेत.आणि या सर्व २४ जागांसाठीमधूनन विविध प्रवर्ग व सर्वसाधारण अश्या १२ जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. यात अनुसूचित जाती ०२ नागरिकांचा मागास प्रवर्ग ०३ जागा राखीव असणार आहेत. सर्वसाधारण ०७ नगरसेवक असतील. पदाच्या पडलेल्या आरक्षणानुसर साधारणपणे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत प्रभागरचना होणार असल्याची माहिती मिळाली आहे. नगरपरिषदचे आरक्षण जाहीर झाले त्यानुसार प्रभाग रचना जाहीर होईल तेव्हा कोणाला कोणत्या प्रभात उमेदवारी करायची हे कळेल. त्यामुळे आताच मुरूम टाकणे आदी सुविधा दिल्या व नंतर तो भाग आपल्या प्रभागात नाही राहीला तर खर्च वाया जाईल या भीतीमुळे इच्छा आहे मात्र मूरूम कुठे टाकु अशी अशी द्विधा मनस्थितीत भावी नगरसेवक दिसत आहेत.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!