मुद्रांक विक्रेत्यांना कोर्ट फी स्टॅम्प तिकीट विक्रीचे आदेश द्यावेत
अँड ऋषिकेश डुचे यांची दुय्यम निबंधक यांच्याकडे मागणी
५,१० रूपयांच्या तिकीटासाठी कोर्ट ते तहसील तीन कीमी नागरिकांची पायपीट
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील नागरिकांना २०० रुपये कोर्ट फि स्टॅम्प, कोर्ट फी ५ रुपये, १० रुपये तिकीटासाठी तीन कीमी पायपीट करावी लागत आहे .
विनाकारण होणारी ससेहोलपट व गैरसोय टाळण्यासाठी सर्व मुद्रांक विक्रेत्यांना २०० रूपये स्टँप ५,१० कोर्ट फी स्टॅम्प तिकीट विक्रीस ठेवण्याचे आदेश करावेत अशी अँड ऋषिकेश मोहन डुचे यांनी जिल्हा दुय्यम निबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .अँड ऋषिकेश डुचे यांनी जामखेड सहाय्यक दुय्यम निबंधक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जामखेड तालुक्यातील सर्व मुद्रांक विक्रेते हे कोर्ट फी स्टॅम्प विक्रीसाठी तहसील अथवा कोर्ट आवारात ठेवत नाहीत. मुद्रांक विक्रेत्यांनी सर्व प्रकारचे मुद्रांक शासकीय नियमाप्रमाणे विक्रीस ठेवणे गरजेचे व आवश्यक आहे. कारण जामखेड तहसीलच्या आवारातील विविध शासकीय आस्थापनांमध्ये कोर्ट फीचे स्टॅम्प वापरल्याशिवाय अर्ज वगैरे कागदपत्रांची प्रोसिजर नागरिकांना करता येत नाही.
मात्र सदर ५,१० रूपयांचे तिखट उपलब्ध होत नाहीत जामखेड तालुक्यातील मुद्रांक विक्रेते सदर कोर्ट फी चे स्टॅम्प तिकिटे विक्री करण्यास परवडत नाहीत असे सांगतात . वास्तविक पाहता मुद्रांक विक्रेत्यांना शासनाने त्यांचा योग्य तो नफा ठरवून दिलेला आहे असे असताना देखील जामखेड तालुक्यातील मुद्रांक विक्रेते हे कोर्ट फी मुद्रांक विक्री ठेवत नाहीत अथवा जामखेड तहसील मधून ते काढत नाहीत. त्यामुळे जामखेड तालुक्यातील नागरिकांची खूप मोठी गैरसोय होत आहे. तसेच जामखेड तालुक्यातील वकिल यांना सुद्धा कोर्ट कामकाजत कोर्ट फी स्टॅम्प जामखेड मध्ये उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय होत आहे.
जामखेड कोर्टातील वकील यांना जिल्हा स्तरावर कलेक्टर कचेरी अथवा जिल्हा कोर्ट सोसायटी मध्ये जाऊन मुद्रांक विकत घेऊन आणावा लागत आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यातील सर्व मुद्रांक विक्रेते यांना कोर्ट फी विक्री ठेवण्याचा निबंधकांनी आदेश करावा. तसेच जामखेड तालुक्यातील मुद्रांक विक्रेते कोर्ट फी स्टॅम्प तहसील आवारात विक्रीसाठी ठेवत नाहीत त्यामुळे नागरिकांना कोर्ट ते तहसिल कार्यालय असा तीन कीलो मीटरची पायपीट करावी लागत आहे.
.त्यासंदर्भात मूद्रांक विक्रेत्यांकडून लेखी खुलासा मागून घेण्यात यावा. तसेच मुद्रात विक्रेते यांनी कोर्ट फी स्टॅम्प विक्रीस न ठेवल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी अँड ऋषिकेश डुचे यांनी केली आहे .
सदर निवेदनाची
प्रत माहितीसत्व
जिल्हा निबंधक वर्ग तथा जिल्हा मुद्रांक अधिकारी अहिल्यानगर यांना देखील पाठविल्या आहेत .
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
