Homeव्हिडिओ बातम्यामाजी विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर रंगला सर्वांच्याच चेहरयावर आनंद दिसला पंचक्रोशी विद्यालय जामखेडमध्ये...

माजी विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर रंगला सर्वांच्याच चेहरयावर आनंद दिसला पंचक्रोशी विद्यालय जामखेडमध्ये कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला

 

माजी विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर रंगला

सर्वांच्याच चेहरयावर आनंद दिसला

पंचक्रोशी विद्यालय जामखेडमध्ये

कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला

जामखेड प्रतिनिधी

माजी विद्यार्थी गेट-टुगेदर हा जुन्या आठवणींना उजाळा देणारा, मैत्री घट्ट करणारा आणि शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा भावनिक सोहळा असतो.

असे मेळावे सहसा शाळा, कॉलेज, किंवा रिसॉर्ट्सवर आयोजित केले जातात,जिथे अनेक वर्षांनंतरही वर्गमित्र एकत्र येऊन बालपणीच्या खोड्या, अभ्यास आणि शिक्षकांच्या आठवणीबाबत बोलतांना आनंद घेतात. जामखेड तालुक्यातील नायगाव येथील पंचक्रोशी विद्यालयात दि १२ मे २०२६ रोजी माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचा गेट-टुगेदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला वेगवेगळ्या बँचचे वेगवेगळ्या वर्षातील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. अनेक वर्षांनंतर एकत्र आल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून येत होता.

यावेळी आवडते शिक्षक उगले सर ,बहिर मॅडम,रामभाऊ उगले सर, साबळे सर,भारत बापू ,राजगुरू सर हे शिक्षक उपस्थित होते .कृष्णा बहिर, अँड.बशीर सय्यद,निलेश उगले,अक्षय उगले,संतोष जाधव,अक्षय थोरात,पूजा उगले,स्वाती उगले,अनिता बहिर, रुपाली सोनवणे, कावेरी उगले हे माझी विद्यार्थी /विद्यार्थिनी उपस्थित होते तसेच ऑनलाईन झूम मध्ये सहभाग घेण्यासाठी कांतीलाल उगले, विठ्ठल जाधव, कृष्णा बहिर मेजर,देवराव उगले,सचिन बहिर, धनु खवळे,विकास गर्जे यांनी हजेरी लावत आनंदात भर घातली .

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रगतीविषयी माहिती देण्यात आली तसेच माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत अनेक खोड्या केल्याचे कबूल केले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, मनोगत आणि विविध उपक्रमांमधून कार्यक्रमाला रंगत आणली. शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकमेकांशी संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि अशा कार्यक्रमांचे आयोजन भविष्यातही व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.हा गेट-टुगेदर कार्यक्रम पंचक्रोशी विद्यालयाच्या इतिहासातील एक संस्मरणीय क्षण ठरला.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!