Homeव्हिडिओ बातम्यामधुकर राळेभात यांचा राष्ट्रवादीला रामराम आ. रोहित पवार यांच्यावर मनमानी...

मधुकर राळेभात यांचा राष्ट्रवादीला रामराम आ. रोहित पवार यांच्यावर मनमानी कारभाराचा व एकाधिकारशाहीचा आरोप

जामखेड प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करत माजी जिल्हा परिषद, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रा मधुकर राळेभात यांनी पक्षाला रामराम केला आहे. प्रा मधुकर राळेभात यांनी पत्रकार परिषदेत अनेक वर्षे सहन केलेल्या गोष्टींचा उल्लेख करत ही माहिती दिली. यामुळे यावेळी बोलताना प्रा मधुकर राळेभात म्हणाले की

मागील विधानसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या प्रेरणेने आम्ही सहभागी झालो व स्थानिक कॅबिनेट मंत्र्याला पराभूत करून रोहित पवार यांना आमदार म्हणून निवडून आणले. पण गेल्या साडेचार वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष न ठेवता बारामती अँग्रो लिमिटेड कामगारासारखी अवस्था केली आहे. त्यामुळे त्यांच्या एकाधिक शाहीला कंटाळून प्रा. मधुकर राळेभात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला व पुढील भूमिका कार्यकर्त्यांना विचारून लवकरच ठरवू असे सांगितले.आज प्रा. मधुकर राळेभात यांनी जामखेड येथे पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला रामराम ठोकला यावेळी नगरसेवक मोहन पवार, अमित जाधव, महालिंग कोरे राष्ट्रवादी खर्डा शहराध्यक्ष, राजेंद्र वारे रत्नापूर उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की,

आमदार रोहित पवार म्हणतात कर्जत जामखेड चा विकास केला पण कर्जत जामखेड मतदारसंघात आजही अनेक समस्या आहेत.

फक्त प्रशासकीय इमारती झाल्या म्हणजे विकास नव्हे. दवाखाने बांधले पण डॉक्टर नाहीत. पंचायत समिती इमारत झाली पण मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे.

कर्जत जामखेड मतदारसंघात अनेक अडीअडचणी चा सामना सामान्य माणसाला करावा लागत आहे.

 

आमदार रोहित पवार यांनी पक्षातील कार्यकर्त्यांनाच कसलीही किंमत देत नाहीत यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांबरोबर मित्र पक्ष शिवसेना व काँग्रेस पक्षाला कसलीही किंमत दिली नाही त्यामुळे सर्वच नाराज आहेत. रोहित पवार यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून पक्षातील व मित्र पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत. कोणाला कसलीही किंमत देत नाहीत. कार्यकर्त्यांना बारामती अँग्रोचे कर्मचारी समजतात. अनेकांना दम देतात. ज्यांनी पक्षासाठी आयुष्यभर काम केले त्यांना कसलीही किंमत देत नाहीत. हुकुमशाही पद्धतीने वागतात.

२०२४ ची विधानसभा निवडणूक स्थानिक विरुद्ध बाहेरचा अशीच होईल. रोहित पवार यांच्या विरोधात स्थानिक सर्व नेते एकत्र राहणार आहेत. पैसे वाटून व साहित्य वाटून आमदार होता येत नाही हे पवारांनी लक्षात ठेवावे. असे प्रा मधुकर राळेभात यांनी सांगितले.

प्रतिनिधी सुबहान शेख 8177851985

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!