Homeव्हिडिओ बातम्याभीषण पाणीटंचाईचा पहिला बळी  पाणी उपसताना विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू ...

भीषण पाणीटंचाईचा पहिला बळी  पाणी उपसताना विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू आनंदवाडी येथील घटना

भीषण पाणीटंचाईचा पहिला बळी 

पाणी उपसताना विहिरीत पडून गरिब शेतकऱ्याचा मृत्यू

आनंदवाडी येथील घटना

जामखेड प्रतिनिधी

 दुष्काळ परिस्थितीमुळे पाणी टंचाईचे भीषण वास्तव समोर आले आहे .विहिरीतून पाणी उपसत असतांना पाय घसरून शेतकऱ्याचा विहीरीत पडुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे .

 बबन बन्सी गीते (वय – ४८आनंदवाडी, ता. जामखेड) असे या घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या जामखेड तालुक्यात पाण्याचे स्रोत आटल्यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. आनंदवाडी परिसरातील विहिरींमधील पाणी खोल गेल्याने दैनंदिन वापरासाठी पाणी मिळवणे कठीण झाले आहे. गुरुवारी सकाळी बबन गीते हे विहिरीवर पाणी काढून आणण्यासाठी गेले होते. विहिरीच्या तळाशी गेलेले पाणी उपसत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते थेट खोल विहिरीत कोसळले.

 

या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना बाहेर काढले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. या घटनेमुळे आनंदवाडीसह संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

काळजीचे चिंतेचे वातावरण:

जामखेड तालुक्यात दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या दुष्काळामुळे पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे. पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना आणि शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या घटनेनंतर हा “जामखेड तालुक्यातील दुष्काळाचा पहिला बळी” असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात पसरली असून, प्रशासनाने तातडीने पिण्याच्या पाण्याची आणि टँकरची सोय करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

 

 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!