Homeव्हिडिओ बातम्याभाजपा व राष्ट्रवादी (शप) काँग्रेस कडून मास्टर स्ट्रोक गेम खेळत नगराध्यक्षपदाबाबत अद्याप...
भाजपा व राष्ट्रवादी (शप) काँग्रेस कडून मास्टर स्ट्रोक गेम खेळत नगराध्यक्षपदाबाबत अद्याप सस्पेन्स कायम
राष्ट्रवादी (शप), भाजपाकडून मास्टर स्ट्रोक गेम
नगराध्यक्ष उमेदवार अद्याप सस्पेन्स:
शिवसेना शिंदे गट पायलताई आकाश बाफना , राष्ट्रवादी काँग्रेस कडुन सुवर्णा महेश निमोणकर उमेदवारी जाहीर
जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भाजप व दोन्ही काँग्रेस तसेच शिवसेना शिंदे गटाने नगरसेवकपदासह नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले.शिवसेना शिंदे गट पायलताई आकाश बाफना , राष्ट्रवादी काँग्रेस कडुन सुवर्णा महेश निमोणकर यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी जाहीर केल्या आहेत. मात्र भाजपा व राष्ट्रवादी (शप) काँग्रेस यांनी मास्टर स्ट्रोक गेम खेळत सगळ्यांच्याच नजरा ताणल्या. या दोन्हीही पक्षांसमोर नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडीत खरच पेच आहे का? अपेक्षित उमेदवार नाही का? समोरचा उमेदवार पाहील्यानंतर ठरवणार का? कोण समोर आहे हे पहाणे म्हणजे घाबरायला होत आहे का? असे एक अनेक प्रश्न भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेच्या मनात उभे केले आहेत.
सत्ताधारी सभापती प्रा राम शिंदे व आमदार रोहित पवार हे आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित करण्यास जाणुनबुजुन उशीर करत आहेत. अशी जनतेतुन चर्चा होत आहे. कोणाच्या मनात काय कोणाच्या मनात काय कळायला मार्ग नाही.
जामखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी दिनांक १७ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत होती. नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले मात्र पक्षाचा एबी फार्म शेवटपर्यंत कोणालाच मिळाला नाही. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपा पक्षाने उमेदवारी घोषित करतांना इच्छूक उमेदवार व जनतेची उच्छुकता फारच ताणली. उमेदवारी अर्ज दाखल केले मात्र अजुनही उमेदवारीबाबत धाकधूक आहे. नेत्यांची राजकीय कूरघोडी अद्याप पुर्ण झाली नाही का? इच्छूक उमेदवारांना मुलाखतीत मिळालेला सिग्नल खरा आहे का? असा सवाल शहरातील तज्ञ नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे.
error: Content is protected !!