बिबट्याने केला गायीवर हल्ला ;गायीचा मृत्यू .दिघोळ पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये घबराहट दवंडी देऊन ग्रामस्थांना जागृतीचे आवाहन पशुविभाग वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली तातडीने दखल
RELATED ARTICLES
दि २६ जूलै रोजी दिघोळ येथील रानात चरत असतांना बिबट्याने आशोक देशमुख यांच्या गायीवर हल्ला करत गायीला तोडले . गायीचा मृत्यू झाला आहे .सायंकाळी रानात गाय जखमी अवस्थेत रक्तबंबाळ होऊन पडल्याचे आशोक देशमुख यांच्या निदर्शनास आले या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .सदर घटना देशमुख यांनी सरपंच ,ग्रामसेवक व नागरिकांना सांगितली .यावेळी सरपंच दशरथ राजगुरू ,सुरज रसाळ , मनोज राजगुरू ,दत्ता शिंदे ,लहु शिंदे ,शिवाजी गिते ,आदींनी घटनास्थळाकडे धाव घेतली .
सरपंच दशरथ राजगुरू यांनी तातडीने वनविभाग पोलीस स्टेशन पशुधनविकास विगागांना कळविली . दि २७ रोजी सकाळी वनविभागाचे रघु सुरवसे, पशुधनविकास आधिकारी श्रीहरी उगले मुगले ,पशु पर्यवेक्षक डॉ अरविंद राऊत ,खर्डा पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली .यावेळी वनविभाग व पशु विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर गायीवर झालेल्या हल्ल्याची पहाणी केली असता तो हल्ला बिबट्याचाच असल्याचे स्पष्ट सांगितले .बिबट्यानेच हल्ला केला समजल्यावर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
दिघोळ ग्रामपंचायत सरपंच दशरथ राजगुरू यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला गावात दवंडी देण्याची सुचना दिल्या .ग्रामस्थांनी जागृत व सावध राहण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले .
नागरिकांना शेतात व इतरत्र जाण्याची भीती वाटत आहे .परिसरातील मुलांना शाळेत पाठवायचे की नाही मोठा प्रश्न पडला आहे .तरी प्रशासनाने बिबट्या पकडण्यासाठी अवश्य ती तयारी व प्रतिबंध करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे .