Homeव्हिडिओ बातम्याबापरे! खर्डा येथील जैन मंदिरात ऐशी हजारांची चोरी, लाकडी दरवाजा तोडुन मुर्ती...

बापरे! खर्डा येथील जैन मंदिरात ऐशी हजारांची चोरी, लाकडी दरवाजा तोडुन मुर्ती वरील दागिने लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

बापरे ! खर्डा  येथे जैन  मंदिराचे  कुलूप तोडून  ८०,००० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरी!

अज्ञाताविरोधात गून्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील जैन  श्वेतांबर मंदिराचा लाकडी दरवाजा तोडुन मुर्ती वरल ऐशी हजार रुपयांची सोने चांदीची दागिने चोरी झाली आहे. अज्ञात चोरांविरोधात खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरी दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७:३० ते २९ जानेवारी रोजी सकाळी ७:०० या कालावधीत झाली आहे.

सोन्याची मालपट्टी (२० ग्रॅम): ६०,००० रुपये,चांदीच्या बारा टिकल्या (१२ भार): ६,००० रुपयेचांदीचा मुकुट (१५ भार): ७,५०० रुपये,चांदीचा नारळ (५ भार): २,५०० रुपये,चांदीचा कंबरपट्टा (८ भार): ४,००० रुपये एकूण किंमत: ८०,००० रुपये

याबाबत  कांतीलाल मोतीलाल खिवंसरा (वय ६०, रा. खर्डा, ता. जामखेड) यांनी फिर्याद दिली असून गुन्हा क्रमांक १२/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय दंड संहिता कलम ३०५(डी), ३३१(४) प्रमाणे दाखल झाला असून, ३० जानेवारी रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अज्ञात चोरट्याने मंदिराचा लाकडी दरवाजाचा कुलूप तोडून आत शिरला आणि मूर्तीवरील सोने-चांदीचे दागिने लबाडीने चोरून नेले आहे सदर घटनेचा पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे  सपोनि उज्वलसिंह राजपूत हे करीत आहेत.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!