Homeव्हिडिओ बातम्याबांधकाम कामगारांसाठी भरिव उपक्रम राबविण्याची गरज आहे :- रमेशभाऊ गुगळे :जामखेडला बांधकाम...

बांधकाम कामगारांसाठी भरिव उपक्रम राबविण्याची गरज आहे :- रमेशभाऊ गुगळे :जामखेडला बांधकाम कामगार मेळावा व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बांधकाम कामगारांसाठी भरिव उपक्रम राबविण्याची गरज आहे :- रमेशभाऊ गुगळे
जामखेड येथे बांधकाम कामगार मेळावा व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

जामखेड प्रतिनिधी
अध्यक्षीय भाषणात रमेश गुगळे म्हणाले की,
जामखेड परिसरातील बांधकाम कामगार बांधवांना शासनाच्या योजनांची माहिती, शासनाची आरोग्य सुविधांबाबत माहिती मिळाव्यात हा या कामगार मेळाव्याचा उद्देश आहे. भविष्यात बांधकाम कामगारांसाठी मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविण्याचा संकल्प आहे. असे एच यू गुगळे पतसंस्थेचे चेअरमन रमेशभाऊ गुगळे यांनी सांगितले. आयकाॅन ग्रुप यांच्या स्कायलाईन इंटरप्राईजेसच्या वतीने दि १४ रोजी महावीर भवन येथे बांधकाम कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थावरून रमेशभाऊ गुगळे बोलते होते.

बांधकाम कामगार हेच कोणत्याही प्रकल्पाचे खरी ताकद असतात. त्यांच्या आरोग्याची आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घेणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे.कामगारांच्या आरोग्याची काळजी व परवडणाऱ्या घरांसाठी आयकॉन ग्रुप चा पुढाकार स्तुत्य आहे. तसेच क्रेडाईच्या माध्यमातून अशा उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिले जाईल. २८० परवडणारी घरे बांधून सर्वसामान्यांसाठी घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयकाॅन ग्रुपने उचललेले पाऊल अत्यंत स्तुत्य आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो,सर्व बांधकाम कामगारांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, त्यासाठी आम्ही नेहमीच पाठीशी आहोत.असे प्रतिपादन क्रेडाईचे महासचिव आशिष पोखरणा यांनी केले.

शहरातील महावीर भवन येथे आज दिनांक १४ जून २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता बांधकाम कामगार बांधवांना शासकीय योजनांचा लाभ सहज मिळावा तसेच त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आयकाॅन ग्रुप यांच्या स्कायलाईन इंटरप्राईजेस यांच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी विशेष मेळावा, आरोग्य तपासणी व कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश गुगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अमित वाघमारे (कन्व्हेनर, सीएसआर, क्रेडाई महाराष्ट्र), प्रसाद आंधळे (वाईस प्रेसीडेंट, क्रेडाई अहिल्यानगर), सागर गांधी (वाईस प्रेसीडेंट, क्रेडाई अहिल्यानगर), धवल इंगळे (कोऑर्डिनेटर, यूथ विंग, क्रेडाई अहिल्यानगर), आशिष पोखरणा (सेक्रेटरी, क्रेडाई महाराष्ट्र), मयुर कोठारी (डायरेक्टर, क्रेडाई अहिल्यानगर), विक्रम जोशी (खजिनदार, क्रेडाई अहिल्यानगर) आदी उपस्थित होते.
यावेळी अमित वाघमारे (कनव्हेनर सीएसआर,क्रेडाई महाराष्ट्र), प्रसाद आंधळे(व्हाईस प्रेजिडेंट क्रेडाई अहिल्यानगर) यांनी आपली मनोगत व्यक्त केली.

यावेळी आयकॉन ग्रुप चे दिलीप गुगळे, सौरभ (विशाल) शिंदे, संतोष फिरोदिया, विवेक कुलकर्णी, युनुस सय्यद,विश्वकर्मा बांधकाम व इतर कामगार संघटना, अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष एकनाथ परदेशी, जिल्हा सचिव श्रीराम परदेशी, जामखेड तालुका अध्यक्ष गणेश परदेशी, सचिव अरुण शिरसाठ, तसेच कडुभाऊ गायकवाड, रोहन कुलकर्णी, महावीर बाफना, मंगेश बेदमुथ्था, पिंटू शेठ बोरा, सचिन फिरोदिया आणि मोठ्या संख्येने बांधकाम कामगार बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक कुलकर्णी यांनी केले व सुत्रसंचलन हनुमंत निकम यांनी तर आभारप्रदर्शन युनुस सय्यद यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी बांधकाम कामगारांनी आरोग्य तपासणीसाठी मोठी गर्दी केली होती.तसेच आरोग्य कार्ड वाटप करण्यात आले.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!