Homeव्हिडिओ बातम्याप्रसिद्ध संग्राहक पोपटलाल हळपावत यांचा ८१ व्या वर्षी नवा संकल्प :समाज जोडण्याच्या...

प्रसिद्ध संग्राहक पोपटलाल हळपावत यांचा ८१ व्या वर्षी नवा संकल्प :समाज जोडण्याच्या छंदात सहभागी सहभागी होण्याचे रमेशभाऊ गुगळे यांचे आवाहन

प्रसिद्ध संग्राहक पोपटलाल हळपावत यांचा ८१ व्या वर्षी नवा संकल्प :
समाज जोडण्याच्या छंदात सहभागी होण्याचे रमेशभाऊ गुगळे यांचे आवाहन.

जामखेड प्रतिनिधी
जामखेडचे सुपुत्र पोपटलालजी हळपावत हे यशस्वी उद्योजक तसेच समाजहितचिंतक व्यक्तिमत्व आहेत. दूर्मिळ जून्या वस्तुंचे संग्राहक आहेत. वयाच्या ८०व्या वर्षीही त्यांची कार्यशीलता आणि समाजासाठी जगण्याची जिद्द इतरांना प्रेरणा देते. पोपटलाल हळपावत यांना दुर्मिळ वस्तू संग्रहाची विशेष आवड आहे. जुन्या नाणी, टपाल तिकीटे, कॅलेंडर यांसारख्या अनमोल वस्तू त्यांनी आयुष्यभर जपल्या आणि अनेक मोठ मोठ्या प्रदर्शनातुन लोकांना त्या दुर्मिळ वस्तुंचे दर्शन घडविले आहे . त्या सर्व वस्तु कोणतीही अट न घालता अहमदनगर संग्रहालयाला त्यांनी दान करून समाजासाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत.
आता ८१ व्या वर्षी त्यांनी आयुष्यातील एक नवा संकल्प केला आहे. ८१,००० व्हिजिटिंग कार्ड्स गोळा करण्याचा संकल्प केला आहे. या समाज जोडण्याच्या छंदा आपण सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष रमेशभाऊ गुगळे यांनी केले आहे. रमेशभाऊ गुगळे पुढे म्हणाले की छंद म्हणजे सामाजिक संबंधांची जोडणी होय. समान आवड असलेले लोक एकत्र येऊन एकमेकांना जोडणे आणि सामाजिक संबंध दृढ करणे. छंदामुळे लोकांना नवीन लोकांशी जोडले जाण्याची, एकत्र येण्याची आणि समाजाचा भाग असल्याची भावना निर्माण होते. छंदामुळे एकटेपणा कमी होतो.
नवीन अनुभव आणि सामाजिक संबंध वाढतात. नवीन मित्र मिळतात. हा त्यांचा केवळ छंद नसून, या माध्यमातून समाजातील प्रत्येकाशी नाते जोडण्याचा, आठवणी जपण्याचा आणि इतिहास पुढे नेण्याचा एक सुंदर उपक्रम आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी
आपल्याकडे जुन्या, न वापरलेल्या किंवा उरलेल्या व्हिजिटिंग कार्ड्स असतील तर फेकून न देता ते त्या वस्तु खालील पत्यावर पाठवावे. व एक समाज जोडण्याच्या छंदात सहभागी व्हावे आणि या महान कार्याचा एक भाग बनावे असे आवाहन लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष रमेशभाऊ गुगळे यांनी केले आहे


पत्ता व संपर्क :
श्री. पोपटलाल हळपावत
जामखेड, जि. अहमदनगर – ४१३२०१
📱 मोबाईल – ९९७५३०७१०२

चला, आपण सर्व मिळून या थोर व्यक्तिमत्वाच्या संकल्पपूर्तीस हातभार लावू या!

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!