Homeव्हिडिओ बातम्याप्रभावी प्रशिक्षण प्रभावी यश - प्राचार्या अस्मिता:स्व एम ई भोरे काँलेजची श्रावणी...

प्रभावी प्रशिक्षण प्रभावी यश – प्राचार्या अस्मिता:स्व एम ई भोरे काँलेजची श्रावणी येडे जिल्ह्यात प्रथम ;विभागीय स्तरावर निवड

प्रभावी प्रशिक्षण प्रभावी यश – प्राचार्या अस्मिता जोगदंड

स्व.एम.ई.भोरे कॉलेजची
कु.श्रावणी  येडे क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम ;विभागीय स्तरावर निवड:

जामखेड प्रतिनिधी
शालेय विद्यार्थ्यांना शिक्षकांकडुन चांगले प्रशिक्षण मिळाले तर विद्यार्थीही प्रभावी कामगिरी करतात. अनेकदा विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शिक्षकांच्या अचूक मार्गदर्शन व सातत्याने पाठपुरावा शिक्षकाच्या परिश्रमाचे योगदानही महत्त्वाचे ठरते असे प्रतिपादन स्व.एम.ई.भोरे ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या अस्मिता जोगदंड /भोरे यांनी केले.

दि ८ ऑक्टोबर रोजी प्रवरा,लोणी (अहिल्यानगर) येथे जिल्हास्तरीय वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत जामखेड येथील स्व.एम. ई.भोरे ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थीनी कुमारी श्रावणी भाऊराव येडे हिने 400 मीटर धावणे (प्लेन)400 मीटर धावणे (अडथळा शर्यत) या दोनही प्रकारांमध्ये जिल्हयात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. श्रावणी येडे हीची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे यश तिच्या मेहनती, चिकाटी, धाडस, आत्मविश्वासामुळे प्राप्त झाले आहे. या यशा मध्ये क्रीडा शिक्षक प्रा.दादासाहेब मोहिते याचे मार्गदर्शन सातत्यपूर्ण परिश्रम विशेष उल्लेखनीय ठरत आहेत. तिच्या या उत्तुंग कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय भोरे ,संचालक प्रा.तेजस भोरे ,प्रा.विनोद बहिर, प्रा.प्रदीप भोंडवे,प्रा.सौ स्वाती पवार मॅडम, प्रा.छबिलाल गावित, प्रा.विवेक सातपुते सहा शिक्षकवर्ग,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी कु.श्रावणीचे मनःपूर्वकअभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. केवळ श्रावणीसाठीच नव्हे, तर स्व.एम. ई. भोरे ज्युनिअर कॉलेजच्या क्रीडा परंपरेसाठीही एक अभिमानाचा क्षण ठरला आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!