प्रभाग ७ मध्ये मोहन पवार यांचा प्रचाराचा झंजावात
सभापती प्रा राम शिंदे यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचार रँलीला सुरूवात केली;
मोहन पवार यांच्या प्रचार रँलीला नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद
जामखेड प्रतिनिधी –
जामखेड नगरपरिषद निवडणूक प्रचार रंगात आला आहे. भाजपाचे प्रभाग क्रमांक सात मधील नगरसेवकपदाचे उमेदवार मोहन पवार यांच्या प्रचाराचा नारळ सभापती प्रा राम शिंदे यांच्या हस्ते फोडून शुभारंभ करण्यात आला. भाजपाचे नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सौ प्रांजलताई अमिंत चिंतामणी व प्रभाग क्रमांक ७ मधील भाजप अधिकृत उमेदवार मोहन पवार व नंदाताई होळकर यांच्या प्रचारार्थ सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते महादेव मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला.
त्यानंतर भव्य रँली काढण्यात आली होती. यानंतर काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. सकाळपासूनच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. उमेदवारांचे समर्थक, युवा कार्यकर्ते तसेच महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला.
प्रभाग ७ मध्ये विकासाच्या मुद्द्यांवर होत असलेल्या निवडणुकीत मोहन पवार यांच्यावर विश्वास दाखवत अनेक मान्यवर नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. सभापती राम शिंदे यांनी भाजपाच्या विकास धोरणांची माहिती देत उमेदवारांच्या विजयाची खात्री व्यक्त केली. प्रचार मिरवणुकीदरम्यान मार्गावर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत सर्वसमावेशक विकासाचे आश्वासन दिले. या उत्साहपूर्ण शुभारंभामुळे प्रभाग क्रमांक ७ मधील प्रचाराला सुरुवातीलाच जोरदार गती मिळाली असून आगामी निवडणुकीत भाजपकडून कडवी लढत होणार आहे, असे चित्र आजच्या मिरवणुकीतून दिसून आले यावेळी प्रभाग क्रमांक ७ मधील युवा वर्ग महिला व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
