Homeव्हिडिओ बातम्यापेट्रोलपंप डिलरशिपच्या आमिषाने जामखेडच्या व्यापारयाला ८४.५३ लाखाला लूटले. शिंदे यांनी दोघांविरुद्ध...
पेट्रोलपंप डिलरशिपच्या आमिषाने जामखेडच्या व्यापारयाला ८४.५३ लाखाला लूटले. शिंदे यांनी दोघांविरुद्ध सायबरमध्ये गुन्हा दाखल केला ‘जिओ’चे अधिकृत डिलरशिप देण्याचे आश्वासन; प्रोसेसिंग फीच्या नावाखाली वर्षभर उकळली लाखोंची रक्कम
जामखेडच्या व्यापारयाला ८४.५३ लाखाला लूटले.
शिंदे यांनी दोघांविरुद्ध सायबरमध्ये गुन्हा दाखल केला
‘जिओ’चे अधिकृत डिलरशिप देण्याचे आश्वासन; प्रोसेसिंग फीच्या नावाखाली वर्षभर उकळली लाखोंची रक्कम
पेट्रोल पंप डिलरशिप मिळवून देण्याचे अमिषाला बळी
जामखेड प्रतिनिधी
पेट्रोल पंप डीलरशिप किंवा परवाना (Petrol Pump Dealership) मिळवून देण्याच्या नावाखाली सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक (स्कॅम) होत आहे.
पेट्रोलपंपाची डिलरशिप मिळवून देण्याचे
आमिष दाखवत प्रोसेसिंग फी, परवाना, कागदपत्रांची पडताळणी आणि विविध प्रशासकीय शुल्कांच्या नावाखाली जामखेड येथील एका व्यापारयाकडुन तब्बल ८४ लाख ५३ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल वर्षभर आरोपींनी डिलरशिप मिळणार असल्याचे आमिष दाखवून देत रकमेची मागणी केली. मात्र, अखेर डिलरशिप मिळाली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित व्यावसायिकाने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी बुधवारी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात सौरभ अग्रवाल आणि शिंदे (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड येथील उदय गुलाबराव शिंदे (वय ५४, रा. रामेश्वर एजन्सी, मार्केटयार्डसमोर, बीड रोड, जामखेड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उदय शिंदे यांचे जामखेड येथे कृषी सेवा केंद्र आहे. आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधून ‘जिओ’ कंपनीचा पेट्रोलपंप उभारण्यासाठी डिलरशिप व अधिकृत परवाना मिळवून देतो, असे सांगितले. त्यासाठी विविध स्तरांवरील मंजुरी, प्रोसेसिंग फी, सिक्युरिटी डिपॉझिट, कागदपत्रांची छाननी आणि इतर प्रशासकीय शुल्क भरावे लागतील, असे सांगून वेळोवेळी मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली.
डिलरशिप मिळणार या विश्वासातून फिर्यादी यांनी आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये आणि ऑनलाइन व्यवहारांद्वारे ऑक्टोबर २०२५ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत एकूण ८४ लाख ५३ हजार रुपये जमा केले.
मात्र, एवढी मोठी रक्कम भरूनही पेट्रोलपंपाची डिलरशिप किंवा परवाना मिळाला नाही. आरोपींकडून वारंवार टाळाटाळ केली जात असल्याने फिर्यादी यांना संशय आला. त्यांनी चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून सायबर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सध्या शोसलमिडियावरुन विविध साईट्स वर अशी विविध प्रकारच्या व्यवसायांच्या फसवणूक करणारया जाहिरात येतात व्यावसायिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे .
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!