Homeव्हिडिओ बातम्यापायलताई आकाश बाफना यांच्या हस्ते पारितोषिक वितरण, महिला दिनी विविध क्रिडा स्पर्धा...

पायलताई आकाश बाफना यांच्या हस्ते पारितोषिक वितरण, महिला दिनी विविध क्रिडा स्पर्धा संपन्न

पायलताई आकाश बाफना यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान

महिला दिनी ग्रामीण विकास केंद्र आयोजित क्रीडा स्पर्धा संपन्न

जामखेड प्रतिनिधी :

जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामीण विकास केंद्र, जामखेड व कोरो इंडिया, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड येथे जिल्हास्तरीय युवती, विवाहित, एकल, विधवा व परित्यक्ता महिलांसाठी दोन दिवसीय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा दि. ७ व ८ मार्च २०२६ रोजी निवारा बालगृह, मोहा फाटा, समता भूमी, जामखेड (जि. अहिल्यानगर) येथे उत्साहात पार पडल्या.


महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा आत्मविश्वास वाढावा तसेच महिलांना सन्मान मिळावा, संविधानिक मूल्यांची जाणीव व्हावी व आपल्या हक्क-अधिकारांची माहिती व्हावी या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. समाजात समानता व स्वाभिमानाची भावना बळकट व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता.
स्पर्धांच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहरातील सामाजिक कार्यकर्त्या पायलताई आकाश बाफना होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून अलकाताई जाधव, उमाताई जाधव,सविता मोरे, संजय लहाने, उद्योजक सोमनाथ भैलुमे, दत्ता भालेराव, अप्पा सरोदे, रूपाली आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘काळीमा’ या लघुचित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. तसेच विविध स्पर्धांतील विजेत्या खेळाडूंना पायलताई आकाश बाफना यांच्या हस्ते रोख पारितोषिक, ट्रॉफी व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
खो-खो स्पर्धेत ग्रामीण विकास केंद्र, जामखेड संघ प्रथम, जगदंबा संघ द्वितीय तर मोहा निवारा बालगृह संघ तृतीय ठरला. कबड्डी (महिला व युवती) गटात कुळधरण जगदंबा संघ प्रथम, निवारा बालगृह द्वितीय व राजमाता संघ तृतीय ठरला. महिला कबड्डीत ग्रामीण विकास केंद्र संघ प्रथम, खर्डा शिवपट्टणम द्वितीय तर अहिल्या संघ तृतीय ठरला.

वैयक्तिक दोरीवरील उड्या स्पर्धेत नताशा ठोकळे प्रथम, ललित पवार द्वितीय व मिनाक्षी पवार तृतीय ठरल्या.
१०० मीटर धावणे (मुली) स्पर्धेत रोहिणी कसबे प्रथम, रविना भोसले द्वितीय व प्रतीक्षा काळे तृतीय ठरल्या.

तर १०० मीटर धावणे (महिला) स्पर्धेत रागिणी वाघमोडे प्रथम, सविता जाधव द्वितीय व प्रियंका गोसावी तृतीय ठरल्या. या क्रीडा स्पर्धांमुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला.

 

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!