Homeव्हिडिओ बातम्यापाणी टंचाई : सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांच्या वतीने मोफत पाणी...

पाणी टंचाई : सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ यांच्या वतीने मोफत पाणी वाटप

पाणी टंचाई
खर्डा शहरात प्रा. सचिन गायवळ यांच्या वतीने मोफत टॅंकरने पाणीपुरवठा.

जामखेड प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट पसरलेली दिसत आहे. ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. खर्डा गावात ग्रामस्थ मोठय़ा प्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जात आहेत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिन गायवळ सर यांनी सामाजिक जाणीवेतुन टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करण्याचे काम सुरू केले आहे. खर्डा शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या मोहरी तलाव व खैरी प्रकल्प तलावातील पाण्याची पातळी खालावली आहे. उन्हाची तीव्रता पाहता तलावातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणीसाठा कमी होऊ लागला असल्याने खर्डा ग्रामपंचायतच्या वतीने नळाचे पाणी नागरिकांना अर्धा तास सोडण्याचा निर्णय घेतल्याने खर्डा शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
अगोदर चार-पाच दिवसांनी होणारा पाणीपुरवठा जर अर्धा तास पाणी नळाला येत असल्याने नागरिकांना भर उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याचे पाहून वडार समाज संघटनेचे अध्यक्ष बबलू सुरवसे यांनी प्रा. सचिन सर गायवळ यांना खर्डा शहराच्या पाणीपुरवठ्याची परिस्थिती सांगितली असता.
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तात्काळ एक पाण्याचा टँकर मोफत खर्डा ग्रामस्थांसाठी दिला असून त्याद्वारे ज्या ठिकाणी पाणीपुरवठा कमी होत आहे. त्या ठिकाणी पाण्याचा टँकरच्या दररोज तीन खेपा सुरू केल्या असल्याने ग्रामस्थांनी प्रा सचिन गायवळ यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आहे. मोफत पाणी पुरवठय़ाचा अनेक ठिकाणी लाभ घेतला जात आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!