Homeव्हिडिओ बातम्यानोडल महिला आधिकारयांच्या मनमानीविरोधात उद्या रास्ता रोको "रत्नदिप काँलेज प्रकरण...

नोडल महिला आधिकारयांच्या मनमानीविरोधात उद्या रास्ता रोको “रत्नदिप काँलेज प्रकरण “

जामखेड प्रतिनिधी

 रत्नदीप मेडिकल कॉलेजमधील महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन या सरकारी संस्थेच्या नोडल ऑफिसर सौ जोत्स्ना बुधगावकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात उद्या दिनांक 30/03/2024 रोजी सकाळी १० वा बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना रितसर निवेदन देण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसापासून रत्नदीप मेडिकल कॉलेज मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या शारीरिक मानसिक व आर्थिक छळवणूकी विरोधात आंदोलन चालू होते या आंदोलनादरम्यान सर्व सरकारी संस्था संबंधित विद्यापीठांनी नोडल ऑफिसरची नेमणूक करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची व्यवस्था केली असता महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन या सरकारी संस्थेने देखील सौ जोत्स्ना बुधगावकर यांची नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी नेमणूक करण्यात आली होती. त्या वेळोवेळी जामखेड येथे येऊन देखील त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्याऐवजी संस्थेची आर्थिक तोडजोडी केल्याचा संशय आहे व त्या जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांची पिळवणूक करत आहेत. तरी सौ जोत्स्ना बुधगावकर यांची नोडल ऑफिसर पदावरून नियुक्ती रद्द करून दुसऱ्या न्याय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी अन्यथा उद्या दिनांक 30 मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून जामखेड येथील खर्डा चौकामध्ये सर्व विद्यार्थी व जामखेड मधील नागरिक सामुदायिक रित्या बेमुदत रस्ता रोको आंदोलन करणार आहेत यावेळी काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सौ जोत्स्ना बुधगावकर यांना जबाबदार धरण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनात विद्यार्थी आण्णासाहेब सावंत – प्रदेश उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड , शिवपरतिष्ठानचे पांडूराजे भोसले , मनसेचे प्रदिप टापरे , सामाजिक कार्यकर्ते केदार रसाळ, सर्व पक्ष, संघटना व समस्त जामखेडचे नागरीक रास्ता रोको आंदोलनात सहभागी होणार आहेत.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!