नान्नज येथील नंदादेवी विद्यालयात मनमानी व गैरकारभार सरपंचांच्या उपोषणास दुसरा दिवस अन्न त्याग व मौन धारण करणार
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील श्री नंदादेवी विद्यालयातील कथित आर्थिक गैरव्यवहार, मनमानी कारभाराची चौकशी तसेच व विविध मागण्यांसाठी सरपंच संतोष पवार यांचे आमरण उपोषण सुरू आहे .दि ११ रोजी दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच आहे. दरम्यान, संबंधित कर्मचारी व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्था अहिल्यानगर समितीच्या प्रतिनिधींनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली.
“माझ्या सर्व मागण्यांबाबत स्पष्ट आणि लेखी
यावेळी सरपंच संतोष पवार यांनी, “उपोषणादरम्यान माझ्या प्रकृतीला काहीही धोका निर्माण झाल्यास किंवा कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास पूर्णपणे संबंधित संस्था व प्रशासन जबाबदार राहील,” असा गंभीर इशाराही दिला.
आंदोलनाच्या पुढील टप्प्यात अन्नत्माग व मौन धारण करणार आहे याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
RELATED ARTICLES


स्वरूपात निर्णय झाल्याशिवाय आंदोलन थांबविणार नाही. उद्यापासून अन्नत्याग करून मौन धारण करून मूक आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215